Pune Accident News saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारने रिक्षाला उडवलं, एक जण जागीच ठार, ४ गंभीर जखमी

Accident in Pune : सोरतापवाडी फाटा परिसरात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Dnyaneshwar Choutmal

Pune Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव कारणे रिक्षाला उडवल्याची घटना घडली आहे. सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या या अपघातात कारने पाठीमागून रिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले आहेत. सोरतापवाडी फाटा परिसरात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

भानुदास गोरे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सुनीता जगताप आणि इंदू जगताप असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. याशिवाय विष्णू राजाराम अंधारे आणि छाया अंधारे (दोघेही रा. सोरतापवाडी, ता. हवेली) अशी किरकोळ जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसरवरून उरुळी कांचनच्या दिशेने एक रिक्षा जात होती. पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास ही रिक्षा सोरतापवाडीतून उरुळी कांचनच्या दिशेने निघाली असताना अचानक पाठीमागून कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षात बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी उरुळीकांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra News Live Update: बारामतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नागरिकांची धावपळ

OTT Weekend List: वीकेंडला पार्टनरसोबत घरी निवांत वेळ घालवायचा आहे का? मग पाहा या 7 रोमँटिक वेब सीरिज

TCS धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा! पीडित तरुणीला दाखवले व्हिडिओ, मौलाना कनेक्शन उघड

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, OBC प्रमाणे ८ योजनांचा मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT