Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident : बेशिस्त बाईकचालकांचा उच्छाद, भरधाव बाईकच्या धडकेत महिलेचा मृत्यू; अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Pune Accident CCTV : बाईकचालकांचा उच्छाद एका महिलेच्या जीवावर बेतला आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune Accident News : पुणे शहरात कर्वेनगर परिसर व उपनगरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेफाम पद्धतीने गाड्या चालवल्या जातात. बाईकचालकांचा हा उच्छाद एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. (Pune News)

भरधाव बाईकच्या धडकेनंतर महिलेचा याउपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाईकच्या धडकेचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून युवकावर कारवाई करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच कर्वेनगर परिसरात श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या बरोबर समोर ही अपघाताची घटना घडली होती. श्रीकृष्ण मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते माननीय समीर वसवे यांच्या मातोश्री रंजना प्रकाश वसवे यांना एका बाईकचालकाने जोरदार धडक दिली होती. त्यानंतर त्यांना तातडीने जवळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

कर्वेनगर हिंगणे होम कॉलनीमध्ये बेफामपणे गाडी चालवणारे, सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्नमधून आवाज काढणाऱ्यांचं प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. याचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. याच्यावर उपाययोजना करणे फार गरजेचे आहे, असं रहिवाशांचं म्हणणं आहे. (Latest News Update)

भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी जनजागृती करणे, ठिकठिकाणी बोर्ड बॅनर लावणे गरजेचं आहे. महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर तयार करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Maharashtra Live News Update: कल्याण पश्चिममधील अनुपम नगर परिसरातील घरावर झाड पडल्याने ३ घरांचे नुकसान

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT