Hadapsar road accident Saam
मुंबई/पुणे

Pune Accident : हडपसरमध्ये२० वर्षाच्या आदित्यवर काळाचा घाला, पेट्रोल भरून निघताना बसने उडवले

Pune accident news today : पुण्याच्या हडपसर-मांजरी रस्त्यावर खासगी टेम्पो ट्रॅव्हलर बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २० वर्षीय आदित्य शेळके याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्याचा मित्र मनोहर रणसिंग जखमी झाला .

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Pune Hadapsar road accident : पुण्यात हडपसर महादेवनगर-मांजरी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार आदित्यचा जागेवरच मृत्यू झाला आहे. येथील सिरम कंपनीच्या समोर टेम्पो ट्रॅव्हल बसने दुचाकीला जोरात धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवर असणाऱ्या २० वर्षाच्या आदित्याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून खासगी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर त्याचा मित्र मनोहर आण्णा रणसिंग (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) हा जखमी झाला आहे. जखमी मनोहर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आदित्य व मनोहर हे दोघे सकाळी हडपसरकडून मांजरी रस्त्याने व्हर्टिव्ह एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वाघोलीकडे निघाले होते. त्यावेळी सिरम कंपनी समोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते मांजरीकडे निघाले असता मांजरीकडून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर बसची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.

या धडकेमध्ये आदित्य शेळके हा जागेवरच ठार झाला. तर,मनोहर रणसिंग जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस चालक माऊली अंभोरे,वय २३ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. मांजरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी करण्यात येत आहे. २० वर्षाच्या आदित्यचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनोहर याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Diet: वजन कमी करायचंय? मग नाश्त्यात हा १ पदार्थ खा, दिवसभर पोट भरलेलं राहील

The Bhabiji Ghar Par Hain movie : चित्रपटाच्या सेटवर भयंकर अपघात; 500 किलोचे झाड कोसळले, मुख्य कलाकारांचा जीव थोडक्यात बचावला, वाचा थरारक प्रसंग

Maharashtra Live News Update: अजित पवार घेणार पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांची बैठक

LIC Policy: LIC ची जबरदस्त योजना! महिन्याला फक्त ४४०० रुपयांचा प्रिमियम, मॅच्युरिटीवर मिळणार १६ लाख

Kitchen Hacks : केळी सतत काळी पडून खराब होतात? मग 'या' टिप्स वापरुन बघा

SCROLL FOR NEXT