बावधन पोलीस ठाण्यातील महिला API लाच घेताना पकडली
५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप
एसीबीने सापळा रचून रंगेहाथ कारवाई केली
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या बावधन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB ) रंगेहाथ पकडलं. गुन्ह्यात मदत करण्यासाठी, नातेवाईकांना अटक टाळण्यासाठी आणि दोषारोपपत्र लवकर दाखल करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरूर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती पांडुरंग तांबे (वय ४१) असे ताब्यात घेण्यात आलेल्या सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याचं नाव आहे. त्या बावधन पोलीस ठाण्यात कार्यरत असून पाटील नगर परिसरात राहतात. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने म्हटल्यानुसार, तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांवर बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासात मदत करण्यासाठी, तसेच नातेवाईकांना अटक टाळण्यासाठी आणि दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी तांबे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर या प्रकरणातील गंभीरता स्पष्ट झाली.
तपासादरम्यान तांबे यांनी यापूर्वी ५० हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. यानंतर एसीबीने सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.