Zika virus News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात झिका व्हायरसची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Pune Zika Virus : पुणे शहरात झिका व्हायरसने धुमाकूळ घालण्यात सुरुवात केली आहे. आतापर्यंत शहरात झिकाचे तब्बल 66 रुग्ण आढळून आले आहेत.

Satish Daud

पुणे शहरात झिका व्हायरसने धुमाकूळ घालण्यात सुरुवात केली आहे. आतापर्यंत शहरात झिकाचे तब्बल 66 रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, यापैकी 26 रुग्ण गर्भवती महिला आहेत. यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

झिकाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे.

पुणे शहरात सुरुवातीला एरंडवणे भागात झिकाचे 4 रुग्ण आढळून आले होते. यापैकी दोन रुग्ण गर्भवती महिला होत्या. त्यानंतर मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात पुन्हा झिकाचे दोन नवीन रुग्ण आढळले. यानंतर शहरात झपाट्याने झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली.

डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव बु तसेच कर्वेनगर आणि खराडी परिसरातही झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले. झिकाची वाढती रुग्णसंख्या पाहता पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला.

रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, झिकापाठोपाठ शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, टायफॉइड या आजारांचा संसर्ग वाढलाय. त्यामुळे आगामी काळात डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.

दोन वर्षांखालील आणि दहा वर्षांवरील मुलांमध्ये डेंग्यु होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये डेंग्यु वाढत असल्याचं समोर आलं आहे. अंगाला सूज येणे, प्लेटलेट्स कमी होणे, तीव्र डोकेदुखी, पुरळ येणे अशी लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत.

त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोयटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

Tur Dal Sambar Recipe: तुरीच्या डाळीचा साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा?

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT