Pune 110 Black Spot Accidet Road List News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Black Spot : नवले पूल, हडपसर, कात्रज ते कोंढवा, पुण्यात तब्बल ११० ब्लॅक स्पॉट, वाचा अपघातांची प्रमुख कारणे

Pune 110 Black Spot Accidet Road List News : पुणे शहरात ११० अपघातप्रवण ठिकाणे ओळखली गेली असून मृत्यू आणि जखमींचे प्रमाण चिंताजनक आहे. वाहतूक कोंडी, वेगमर्यादा उल्लंघन आणि अपुरी पायाभूत सुविधा अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.

Alisha Khedekar

पुण्यात ११० अपघातप्रवण ठिकाणे

कात्रज–मंतरवाडी व पुणे-सोलापूर रस्ता सर्वाधिक धोकादायक

पायाभूत सुविधांचा अभाव आणि नियमभंग अपघातांना कारणीभूत

प्रशासन व वाहनचालक दोघांनीही जबाबदारी घेणे आवश्यक

पुणे आणि वाहतूक कोंडीच एक वेगळंच समीकरण आहे. अशातच पुण्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरातील अपघात होणारी ११० अपघातप्रवण ठिकाणे निश्‍चित केली आहेत. या अपघातप्रवण ठिकाणी मृत्यू आणि जखमींचे प्रमाण चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.

'हे' मार्ग सर्वाधिक धोकादायक

पुणे-सोलापूर रस्ता, पुणे-नगर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, मुंबई-बंगळूर महामार्ग आणि पुणे-सासवड मार्गावर सगळ्यात जास्त अपघातप्रवण ठिकाणं आढळले आहेत. या रस्त्यांवर वेगमर्यादेचे उल्लंघन,अवजड वाहनांची वर्दळ, अचानक येणारी वळणे, चुकीची पार्किंग आणि अपुरी सिग्नल व्यवस्था ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत.

कात्रज- मंतरवाडी रस्ता धोकादायक

मोठं मोठ्या अवजड वाहनांमुळे कात्रज- खडी मशिन चौक- पिसोळी- उंड्री- मंतरवाडी हा रस्ता छोट्या गाड्यांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. खडी मशिन चौक सर्वाधिक अपघातप्रवण बनला आहे. या चौकातून पिसोळीच्या दिशेने वळताना अरुंद रस्ता आहे. येवलेवाडीतून कोंढव्याकडे येताना तीव्र उतार आहे. त्यात बेजबाबदार वाहनचालकांची भर पडल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी या भागातील अतिक्रमणे काढून चौकात चारही बाजूला पुरेसे पोलिस आणि वॉर्डन ठेवून समन्वयाने वाहतूक नियमन करण्याची गरज आहे. या रस्त्यावर रात्री पथदिवे बंद असल्याने अंधारातच मार्ग काढावा लागत असल्याचं चित्र आहे. नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

पुणे ते सोलापूर रस्ता धोकादायक

कात्रज ते मंतरवाडी रस्त्यासोबतच पुणे ते सोलापूर रस्ता हा सर्वाधिक धोकादायक ठिकाण ठरला आहे. गेल्या तीन वर्षांत ३० गंभीर आणि प्राणघातक अपघात झाले असून या अपघातात ११ जणांचा मृत्यू आणि १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा रस्ता, वारजे उड्डाणपूल नवले पूल बसथांबा, खडी मशिन चौक, स्वारगेट चौक, विमाननगर चौक, खराडी बायपास, लोणी काळभोर, पेरणे फाटा आदी ठिकाणांचा समावेश धोकादायक अपघातप्रवण ठिकाणांमध्ये आहे.

नियमांचे पालन करणे आवश्यक

वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट्स’वर सिग्नल सुधारणा, वेगमर्यदेवर नियंत्रण, रस्ते चिन्ह, प्रकाश व्यवस्था आणि सीसीटीव्ही देखरेख आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्याचबरोबर वाहनचालकांनीही वेगावर नियंत्रण ठेवणे, नियमांचे पालन करणे आणि सुरक्षित वाहन चालविण्यासाठी शिस्त पाळणे गरजेचे आहे. दरम्यान पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात पाचव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway-Truck Accident: झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात; ट्रेन आणि ट्रकची जोरदार टक्कर, बाईकचा चुराडा, Video व्हायरल

Kundan Jewellery Set: नववधूसाठी कुंदन ज्वेलरीचे 5 लेटेस्ट पॅटर्न, लेहेंगा असो साडी शोभून दिसेल

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल, प्रकरण काय?

Jalgaon Mayor : जळगाव महापालिकेच्या महापौरपदी महिलाराज, ४ महिलांचं नाव चर्चेत; वाचा संपूर्ण

काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या पुतण्याने बायकोला संपवलं, नंतर स्वत:वर झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT