Pub Owners Employees Strike In Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात वातावरण तापलं; पब मालक आणि कर्मचारी आक्रमक, थेट रस्त्यावर उतरले

Rohini Gudaghe

पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात वातावरण तापलं आहे. पब मालक आणि कर्मचारी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. ड्रंक आणि ड्राईव्ह प्रकरणानंतर पोलिसांनी शहरातील अनेक पबवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नाहक त्रास होत आहे, अशी भूमिका घेत पब मालक आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. दोन बारच्या चुकांमुळे आमच्यावर अन्याय नको, असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. साधारण ५० पब मालत आणि २५०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे.

दोन बारच्या चुकीमुळे आमच्यावर अन्याय करू नका. आमच्यावर अशी कारवाई करू नका, असं या पब मालकांचं म्हणणं आहे. आता पुण्यात (Pune News) ५० पब मालक आणि २५०० कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी बोलताना एका पब कर्मचाऱ्याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. आज एका श्रीमंताच्या मुलाच्या अपघातामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असेल, तर ही चुकीची गोष्ट आहे. आम्हाला योग्य न्याय मिळावा अशी विनंती करत असल्याचं या कर्मचाऱ्याने म्हटलं (Pub Owners Strike In Pune) आहे.

आम्ही शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटसाठी घेतलं (Pub Owners Employees Strike) आहे. हॉटेलच बंद कराल तर आम्ही नोकरी कुठे करायची, आमच्या पोटावर लाथ येईल, असं पबमध्ये नोकरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. झालेल्या घटनेत आमची काही चूक नाही, त्यामुळे आमच्या पोटावर पाय देऊ नका अशी विनंती या महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. यावेळी पब मालक आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात महिला कर्मचाऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर समावेश दिसत आहे.

पुण्यात १८ मे रोजी रात्री एका अल्पवयीन मुलाने चारचाकीची धडक (Porsche Car Accident) दिल्यामुळे एका तरूण आणि तरूणीचा जागीच मृत्यू झाला होता. हा तरूण मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आढळलं होतं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अल्पवयीन मुलाने पबमध्ये मद्य प्राशन केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुण्यातील पबवर देखील कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे आता पब मालक आणि कर्मचारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT