बघतोय रिक्षावाला फोरम कडून, बजाज फायनान्स कंपनीच्या विरोधात निदर्शने! सागर आव्हाड
मुंबई/पुणे

बघतोय रिक्षावाला फोरम कडून, बजाज फायनान्स कंपनीच्या विरोधात निदर्शने!

फायनान्स कंपन्या RBI व सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे पैसे वसुल करत आहेत.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पिंपरी चिंचवड : लॉकडाऊन Lockdown लागल्यापासून अर्थचक्र जवळपास पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे गोरगरीब कष्टकरी व लघुउद्योजकांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे अशक्य झाले आहे. जेव्हा अशाप्रकारचे प्रश्न उद्भवतात तेव्हा त्यासाठी न्यायव्यवस्थेद्वारे त्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध असून, बजाज फायनान्स Bajaj Finance सारख्या फायनान्स कंपन्या RBI व सर्वोच्च न्यायालयाचे Supreme Court निर्देश पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे पैसे वसुल करत आहेत. तसेच सावकारी पद्धतीने विविध प्रकारचे दंड लावून कर्जदारास जेरीस आणत असल्याचा आरोप करत या सर्वल गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज बघतोय रिक्षावाला फोरम कडून विरोधात बजाजच्या वाकडेवाडी शोरूम Showroom समोर निदर्शने करण्यात आली.(Protests against Bajaj Finance Company)

हे देखील पहा -

कंपन्यांच्या गुंडागर्दीची अशी प्रकरणे अनेक वेळा प्रसारमाध्यमांद्वारे जनसामान्यांसमोर येऊन सुद्धा PCMC पोलीस PCMC Police आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये फायनान्स कंपन्यांच्या गुंडागर्दी विरोधात एकाही FIR ची नोंद झालेली नाही. यामुळे पोलिस यंत्रणा आणि फायनान्स कंपन्या यांच्यामध्ये काही लागेबंधे आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

काल वायरल झालेल्या ऑडिओ क्लिप Viral Audio clipमध्ये ज्याप्रकारे अर्वाच्य भाषेमध्ये बजाज फायनान्स कंपनीच्या गुंडांनी एका रिक्षा चालकास आई व बहिणी वरून घाणेरड्या शिव्या दिल्या, तसेच प्रकार राजरोसपणे पुणे आणि चिंचवड शहरामध्ये घडत असून पोलीस अशा प्रकारांमध्ये तक्रार दाखल करून घेत नाहीत.  याचा निषेध म्हणून आम्ही बजाज फायनान्स या वाकडेवाडी येथील शोरूम समोर निदर्शने असल्याच आंदोलकांनी सांगितलं.

तसेच गेल्या चार वर्षांमध्ये रिक्षाचालकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत,  त्या मागण्यांची सरकार दरबारी कोणतीही दखल घेण्यात येत नाही.  ओपन रिक्षा परमिट,  इ-रिक्षा, बाईक टॅक्सी या गोष्टी सरकारने ताबडतोब बंद कराव्यात नाहीतर रिक्षाचालकांची रोजीरोटी संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे 30 ऑक्टोबर पर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश असताना सुद्धा कागदपत्रांच्या कमतरतेसाठी RTO व पोलीस यांच्याकडून रिक्षाचालकांना वेठीस धरून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दंड वसूल करण्याचे सत्र चालू आहे.  या सगळ्याचा निषेध करण्यासाठी पिंपरी चौक चिंचवड येथे बघतोय रिक्षावाला कडून निदर्शने करण्यात आली. सदर आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सरकारला इशारा दिला कि, जर येत्या आठवड्यामध्ये सदर बाबींकडे लक्ष घालून सरकारने रिक्षाचालकांच्या समस्या सोडवल्या नाहीत तर बघतोय रिक्षावाला फोरम कडून अमरण उपोषण छेडण्यात येईल.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT