पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या PCMC एकूण नऊ रुग्णालयातील 540 कोविड योद्धे Covid warriors ठिय्या आंदोलन करत आहेत. यात 150 डॉक्टरांचा देखील समावेश आहे. 'गरज सरो वैद्य मरो' अशी सोयीस्कर भूमिका पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतली आहे. कोरोना महामारीच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेने आरोग्य विभागामध्ये थेट डॉक्टर्स, ब्रदर आणि सिस्टर यांची नेमणूक केली होती. त्यांचं नियमित वेतन देखील महापालिका देत होती. मात्र आता या कोविड योध्याना महापालिके एवजी कंत्राटदारांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. त्यातही अतिशय जाचक अटी कंत्राटदारांनी कोविड योध्या डॉकटरावरती घातल्या आहेत. (Doctors warn Pimpri-Chinchwad Municipal Corporation to go on fast unto death)
हे देखील पहा -
महापालिकेने कोरोना योध्दा डॉक्टरांवर कंत्राटदार Contractor आणून बसवण्याचा घाट घातल्याच्या निषेधार्थ कोविड योद्धा बचाव कृती समितीच्या Kovid Warrior Rescue Action Committee वतीने महापालिकेच्या मुख्यालयासमोर गेल्या सात दिवसापासून बेमुद्दत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.
महापालिका आम्हाला वेतन देतच होती, मग आमच्यावर कंत्राटदार लादण्याची गरज काय ? फक्त कंत्राटदारांची हित जोपासण्यासाठी महापालिका कोविड योद्धे डॉक्टरावर कंत्राटदारा लादत आहे. असा आरोप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड योध्या डॉक्टरानी केला आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी मापक मागणी या डॉक्टरांनी केली आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसून असा इशारा कोविड योद्धा डॉक्टरांनी दिला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.