मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या घरावरील हल्ला प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांनी भडकविल्याचा आरोप असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरामध्ये छापेमारी झाली असता अनेक गोष्टींचा खुलासा झाल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गिरगाव कोर्टात (Court) दिली आहे.
एॅड गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचा ताबा घेण्यासाठी आज कोल्हापूर पोलिसांची एक टीम गिरगाव कोर्टात दाखल झाली आहे. यावेळी सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांना (Kolhapur Police) सदावर्ते यांची कोठडी मागितली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत कोर्टात युक्तीवाद करताना त्यांनी सदावर्तेंच्या घरात सापडलेल्या गोष्टींची माहिती कोर्टाला दिली.
अजित मगरे आणि संदीप गोडबोले यांनी संयुक्तपणे पवारांच्या घराची रेकी केली होती अशी माहिती आता समोर आली आहे. तसंच तपासात काही आर्थिक व्यवहारबद्दल माहिती समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात केलेल्या छापेमारीमध्ये नोट मोजायचे मशीन, संशयास्पद कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आली आहेत.तसंच सदावर्ते यांनी डेपो प्रमाणे व्हॉट्सॲप ग्रुप बनवले होते, ज्याद्वारे माहिती फॉरवर्ड केली जायची. शिवाय 85 लाख रुपये मशिनी द्वारे मोजले गेले असल्याची माहितीही सरकारी वकिलांनी (Public Prosecutor) दिली.
तसंच या पैशातून 23 लाख रुपयाची कार घेतली असून भायखळा मध्ये एक जागा घेतली आहे, पण त्याचा व्यवहार पूर्ण झाला नव्हता. सदावर्ते यांच्या घरातून मिळालेल्या पुरावे आणि कागदपत्रांच्या संदर्भात चौकशी गरजेची असून, चौकशीसाठी आम्हाला सदावर्तेंची कोठडी हवी असल्याचा युक्तीवाद घरत यांनी केला आहे. दरम्यान, अजित मगरे संदीप गोडबोले यांना 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली असून उद्या गिरगाव कोर्टात सदावर्ते यांना हजर करण्यात येणार असून त्यांच्या कोठडी संदर्भात उद्या कोर्ट निर्णय देणार आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.