Shivsena Vs MNS: 'मनसे'नंतर शिवसेनेचीही अयोध्या दौऱ्याची तयारी

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : शिवसेनाभवनामध्ये आज शिवसेना नेत्यांची आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या अयोध्या दौऱ्याबाबतच्या नियोजनाबाबतची चर्चा या बैठकीत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आता हिंदुत्वाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापवलं आहे. हनुमान चालीसा, भोंग्याबाबतचा अल्टिमेटम आणि अयोध्या दौरा या मुद्यावरुन राज यांनी हिंदुत्वाबाबतची रणनीती आखली आहे. मात्र राज यांच्या प्रत्येक कृतीवर शिवसेना देखील आपण हिंदुत्व सोडलं नसल्याचं दाखवून देत आहे.

यासाठी त्यांनी देखील मनसेच्या प्रत्येक उपक्रमाला उत्तर दिलं आहे. अशातच आता 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार असल्याचं त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत घोषणा केली होती.

हे देखील पहा -

त्यामुळे आता शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. त्यावरच आता शिवसेना भवनात शिवसेना नेत्यांची महत्वाची बैठक होत आहे. बैठकीला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि इतर पदाधिकारी उपस्थित रहाणार असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com