पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर आज चर्चा Saam Tv
मुंबई/पुणे

पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर आज चर्चा

टास्क फोर्सच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा (School) सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावावर उद्या 23 नोव्हेंबरला राज्य कोरोना (Corona) टास्क फोर्सच्या (Task Force) बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या सुट्टीपूर्वी शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिह्यांची माहिती घेऊन पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करता येतील काय यासाठीची चाचपणी केली होती.

हे देखील पहा -

तर दिवाळीनंतर राज्यात कोरोनाच्या रुग्ण वाढीचा दर आणि एकुणच परिस्थितीचा अभ्यास करून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांच्या मार्फत शिक्षण सचिवांकडे पाठवला होता. त्यामुळे हा अहवाल पुढील मंजुरीसाठी राज्य टास्क फोर्सकडे पाठविण्यात आला आहे.शिक्षण विभागाच्या प्रस्तावावर टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा होणार असल्याने त्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यासाठी बैठकीत संमती मिळाल्यास राज्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवडयापासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यात मागील काही महिन्यांपासून शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पहिली ते चौथीपर्यंतच्याही शाळा सुरू करण्याची मागणी विविध पालक आणि शैक्षणिक संघटनांनी केली होती. तर काही संघटनांनी लहान मुलांचा जीव धोक्यात घालून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यास विरोधही दर्शवला होता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT