Property tax hike may increase homeowners commercial property owners AI Image
मुंबई/पुणे

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

Property Tax Hike Update News : महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता कराचा मोठा भार पडण्याची शक्यता. निवासी मालमत्ता करात १२% आणि बिगर निवासी करात २०% वाढीचा प्रस्ताव असून १०४.६७ कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे.

Alisha Khedekar

  • निवासी मालमत्ता करात १२% वाढ मंजूर

  • बिगर निवासी मालमत्ता करात २०% वाढ

  • करवाढीतून महापालिकेला सुमारे ₹१०४.६७ कोटींचा अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता

  • घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बाजारमूल्याच्या ०.५% हस्तांतरण शुल्काचा प्रस्ताव

विकास काटे, ठाणे

महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या खिशावर आता मालमत्ता कराचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. निवासी मालमत्तांच्या मालमत्ता करात १२ टक्के, तर बिगर निवासी मालमत्तांच्या करात तब्बल २० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या करवाढीतून महापालिकेच्या तिजोरीत सुमारे १०४.६७ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने ही करवाढ करण्यात आली आहे. मात्र, आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी या निर्णयामुळे आर्थिक भार वाढणार आहे. विशेषतः निवासी मालमत्तांच्या करात १२ टक्के वाढ झाल्यास घरमालकांच्या वार्षिक कराच्या रकमेत वाढ होणार आहे. व्यावसायिक आणि बिगर निवासी मालमत्ताधारकांना त्याहून अधिक म्हणजे २० टक्के वाढीचा सामना करावा लागणार आहे.

घर खरेदी-विक्रीही महागणार

मालमत्ता करात झालेल्या बदलामुळे घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरही मोठा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या जमिनीच्या क्षेत्रफळावर कर आकारले जाते. त्याऐवजी शासनाने निश्चित केलेल्या बाजारमूल्याच्या ०.५ टक्के शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या बदलाचा सर्वाधिक परिणाम महागड्या मालमत्तांच्या व्यवहारांवर होणार आहे. मालमत्तेचे बाजारमूल्य जितके जास्त, तितके हस्तांतरण शुल्कही वाढणार असल्याने खरेदीदारांना व्यवहाराच्या वेळी मोठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागू शकते. काही महागड्या मालमत्तांच्या व्यवहारात हा अतिरिक्त खर्च लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

दरम्यान, अनधिकृत मालमत्तांच्या हस्तांतरण शुल्कात तब्बल तीनपट वाढ करण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामुळे अशा मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर आर्थिक भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी हे निर्णय महत्त्वाचे मानले जात असले, तरी करवाढ आणि हस्तांतरण शुल्कातील वाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रस्तावाच्या अंमलबजावणीकडे मालमत्ताधारक तसेच घर खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळंल

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT