Property Tax  Saam Digital
मुंबई/पुणे

Property Tax : मालमत्ता कर भरण्यासाठी ३१ मार्चला रात्री १२ पर्यंत खुली राहणार सुविधा केंद्रे

Sandeep Gawade

Property Tax

मुंबई शहर आणि उपनगरांमधील मालमत्‍ताधारकांना निर्धारित कालावधीत मालमत्तेचा करभरणा करता यावा यासाठी नागरी सुविधा केंद्र सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी म्हणजेच उध्या २७ ते ३० मार्चदरम्‍यान महानगरपालिका मुख्‍यालयासह सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील सुविधा केंद्रांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, आर्थिक वर्षाच्‍या अखेरच्‍या दिवशी अर्थात दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्टाइतके मालमत्ता कर संकलित करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके गेल्या फेब्रुवारीच्या अखेरीस पाठविली आहेत. त्यानंतर निर्धारित कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यापूर्वी आपल्या मालमत्तेसंबंधीचे कर भरण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने संबंधित प्रशासकीय विभागांमध्ये येत आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शुक्रवारी २९ मार्च रोजी ‘गुड फ्रायडे’ निमित्त सार्वजनिक सुटी आहे. तर,३० मार्च आणि दिनांक ३१ मार्च साप्‍ताहिक सुटी आहे. त्यावेळी, मालमत्ता करभरणा करण्यासाठी येणाऱया नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि निर्धारित वेळेत करभरणा व्हावा, यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील साप्ताहिक आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्‍या वतीने घेण्यात आला आहे.

उध्या २७ ते ३० मार्चदरम्‍यान महानगरपालिका मुख्‍यालयासह सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील नागरी सुविधा केंद्र तसेच तुंगा व्हिलेज (एल विभाग), कांजूरमार्ग (पूर्व) येथील लोढा संकुल इमारत (एस विभाग) आणि पी / पूर्व विभाग येथील नवीन नागरी सुविधा केंद्र आदी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच, रविवारी ३१ मार्च रोजी सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील.मालमत्ता करायचा भरणा करावा असे आवाहन पालिकेने केले आहे.

कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी

१) समीर भोजवानी (के पश्चिम विभाग) – ३८ कोटी १० लाख ५१ हजार ९६० रुपये

२) राजहंस असोसिएट्स (एस विभाग) – ३६ कोटी २६ लाख ६४ हजार २०८ रुपये

३) तनिष्‍क बिल्‍डर्स (एन विभाग) - १३ कोटी ८६ लाख ६० हजार ६६३ रुपये

४) आहुजा कन्‍स्‍ट्रक्‍शन (जी दक्षिण विभाग) – ११ कोटी ७३ लाख २ हजार ५४४ रुपये

५) कमलाबाई गोवर्धनलाल (ए विभाग) – १० कोटी ९२ लाख ७२ हजार ६४२ रुपये

६) शुभदा सहकारी गृहनिर्माण संस्था (जी दक्षिण) – १० कोटी ११ लाख ९६ हजार ९१ रूपये

७) प्रेम बिल्‍डर्स (के पूर्व विभाग) - ७ कोटी २३ लाख ८४ हजार ५२६ रुपये

८) न्‍यू शिरीन टॉकीज् (जी दक्षिण विभाग) – ६ कोटी ४१ लाख ७१ हजार ८४१ रुपये

९) न्‍यू आराम रेस्‍टॉरंट (एच पूर्व विभाग) – १ कोटी ४७ लाख १३ हजार २८१ रुपये

१०) संघवी स्‍वेअर प्रीमायसेस (एन विभाग) - १ कोटी २७ लाख ५२ हजार ९२२ रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT