Prithviraj Chavan Saam Tv
मुंबई/पुणे

Prithviraj Chavan: अंतर्गत कलह आणि चुकीचे निर्णय पराभवाला कारणीभूत, पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव हा फल्यग्रस्त करणारा असला तरी आम्हाला अनपेक्षीत नव्हता.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव हा फल्यग्रस्त करणारा असला तरी आम्हाला अनपेक्षीत नव्हता, हे होणारच होतं, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडी पराभवाला कारणीभूत असल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय.

देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election) निकाल आज जाहीर झाले आहेत. यामध्ये देशातील सर्वाधिक मतदार संघ असलेल्या उत्तर प्रदेशसह, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर येथे भाजपने बहुमत मिळवलं आहे. तर, पंजाबमध्ये आपने दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, काँग्रेसला यापैकी एकाही राज्यात सत्ता मिळवता आली नाही. काँग्रेससाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. यामागील नेमकी कारणं काय याबाबत पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितली आहेत.

हे होणारच होतं - पृथ्वीराज चव्हाण

"हा पराभव वैफल्यग्रस्त करणारा असला तरी आम्हाला अनपेक्षीत नव्हता, हे होणारच होतं. आम्ही काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींबाबत पक्षश्रेष्ठींना एक गुप्त पत्र दिलं होतं. त्यानंतर तब्बल दीड वर्षाने आम्हाला वेळ मिळाली.आम्ही त्यातही मते मांडली. पण, पुढे काहीच झालं नाही".

"अंतर्गत कलह आणि चुकीचे निर्णय काँग्रेसच्या (Congress) पराभवाला कारणीभूत आहेत. गोवा, उत्तराखंड, पंजाब येथील काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडी पराभवाला कारणीभूत आहेत. एकट्या प्रियांका गांधींच्या जोडीला संपूर्ण काँग्रेसनं उभं राहिलं पाहिजे होतं. पण, सोनिया गांधीही तिकडे गेल्या नाहीत", असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या परिभवाची कारणं सांगितली आहेत.

आप काँग्रेसची जागा घेऊ शकत नाही - पृथ्वाराज चव्हाण

"5 राज्यात निवडणुका होत्या. इतर राज्यातील काँग्रेसनं झोकून द्यायला हवं होतं, ते झालं नाही. काहीही झालं तरी आप काँग्रेसची जागा घेऊ शकत नाही. आप काँग्रेसला पर्याय होऊ शकत नाही. आजच्या निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रातील सरकारवर होणार नाही", असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT