डोंबिवली मधून निघाली पंढरपूरला "अक्षरांची वारी"...
डोंबिवली मधून निघाली पंढरपूरला "अक्षरांची वारी"... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

डोंबिवली मधून निघाली पंढरपूरला "अक्षरांची वारी"...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डोंबिवली : कोरोनाच्या Corona महामारीमुळे यंदा वारीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. मात्र असे असले तरी डोंबिवली Dombavali मधील प्रितेश भाग्यवंत यांनी डोंबिवली मधून अनोखी वारी सुरु केली आहे. यंदा प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीमध्ये Pandharpur Wari सहभागी होता आले नसले तरी त्यांनी थेट डोंबिवली मधून अक्षरांची वारी सुरु केली आहे.

हे देखील पहा -

आषाढी आणि वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देवाची आळंदी येथून पंढरपूर कडे प्रस्थान करत असतात. मात्र कोरोनामुळे वारीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे प्रितेश भाग्यवंत या तरुणाने डोंबिवली मधून अक्षरांची वारी सुरु केली आहे. प्रितेश दरवर्षी आपल्या कुटुंबियांसह वारीमध्ये सहभागी होत असतो.

मात्र यंदा कोरोना निर्बंधांमुळे प्रितेश यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी दिंडीमध्ये सहभागी न होता शासनाच्या नियमांचे पालन केले आहे. मात्र असे असताना प्रितेश यांनी आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून वारी यंदा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या अंगीकृत कलेला वाव देत त्यांनी अत्यंत सुंदर हस्तक्षराच्या माध्यमातून दररोज निरनिराळ्या पद्धतीने चित्र रेखाटत वारीत सहभागी झाल्याचे समाधान व्यक्त करत आहेत. मूळचे कल्याणच्या मलंगगड येथील अंभे गावचे असलेले प्रितेश भाग्यवंत हे डोंबिवली मध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांच्या अंगीकृत कलेचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

Today's Marathi News Live : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT