Fire Service Medal Saam Tv
मुंबई/पुणे

Indian Independence Day: राष्‍ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांना जाहीर

Fire Service Medal: राष्‍ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांना जाहीर

साम टिव्ही ब्युरो

Fire Service Medal: राष्‍ट्रपती अग्निशमन सेवा पदकप्राप्‍त जवानांची यादी केंद्रीय गृह मंत्रालयाच्‍या अखत्‍यारीतील ‘अग्नि सेवा, नागरी सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालय’ यांच्याद्वारे स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पूर्वसंध्‍येला (दिनांक १४ ऑगस्‍ट २०२३) जाहीर केली आहेत. त्‍यात मुंबई अग्निशमन दलातील प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र नारायणराव आंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी दीपक कालीपद घोष, दुय्यम अधिकारी सुनील आनंदराव गायकवाड, प्रमुख अग्निशामक पराग शिवराम दळवी, अग्निशामक तातू पांडुरंग परब यांचा समावेश आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सहआयुक्त (सुधार) रमेश पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक प्राप्‍त अग्निशमन अधिकारी व जवानांचे अभिनंदन करित त्‍यांच्‍या पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. (Latest Marathi News)

महाराष्‍ट्रातील आठ जवानांना राष्‍ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये "शौर्यम् आत्मसंयमनम् त्याग:" हे ब्रीदवाक्य असलेल्या मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांचा समावेश आहे. त्यांच्या बाबतचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणेः-

१) प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर हे ३० वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्‍यांना यापूर्वी राष्‍ट्रपतींचे शौर्य पदक, आयुक्तांचे अतुलनीय शौर्य पदक आदी पुरस्काराने गौरविण्‍यात आले आहे.

२) उपप्रमुख अग्निशमन अधिकारी दीपक कालीपद घोष हे देखील गेली ३० वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्‍यांना यापूर्वी राष्‍ट्रपतींचे शौर्य पदक, आयुक्तांचे अतुलनीय शौर्य पदकाने गौरविण्‍यात आले आहे. घोष यांनी ‘फायर इंजिनीअरींग’ या विषयात इंग्‍लंड येथील विदयापीठातून पी.एचडी पदवी प्राप्‍त केली आहे. ‘आयर्नमॅन’ किताब पटकाविणारे ते भारतीय अग्निशमन सेवेतील एकमेव अधिकारी आहेत. जागतिक अग्नि स्‍पर्धेत (वर्ल्‍ड फायर गेम) सहभागी होऊन त्‍यांनी भारतासाठी ७ पदके पटकाविण्‍याची कामगिरी देखील केली आहे.

३) शहर भागातील मेमनवाडा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले दुय्यम अधिकारी (सब ऑफिसर) सुनील गायकवाड हे गेली ३२ वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्‍यांना उत्‍कृष्‍ट अग्निशामक पारितोषिकाने यापूर्वी दोनवेळा गौरविण्‍यात आले आहे.

४) भायखळा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) पराग शिवराम दळवी हे गेली ३१ वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्‍यांना खात्‍याअंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्‍यात आले आहे.

५) अग्निशामक (फायरमन) तातू पांडुरंग परब हे सध्‍या विक्रेाळी अग्निश्‍मन केंद्रात कार्यरत असून त्‍यांनी मुंबई अग्निशमन दलात ३२ वर्षे सेवा बजाविली आहे. त्‍यांनादेखील खात्‍याअंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्‍यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death : खोलीत पेस्ट कंट्रोल केला, दारं-खिडक्या बंद; ट्रेनी पोलिसाचा गुदमरून मृत्यू, दिवाळीत दुर्दैवी घटना

Maharashtra Live News Update: पुण्यात पी एम पी बस चालकाकडून मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Meghalaya Travel: पृथ्वीवरील स्वर्ग! वर्षभर पडतो पाऊस; हिरवळ, धबधबे आणि निसर्गसौंदर्याचे खजिना पाहून तुम्हीही व्हाल थक्क

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

SCROLL FOR NEXT