शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आराखडा तयार- बच्चू कडू ...(व्हिडीओ) Saam Tv
मुंबई/पुणे

शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आराखडा तयार- बच्चू कडू ...(व्हिडीओ)

कोरोनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर तर झालाच आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळा सुरु व्हाव्यात म्हणून पालक एकीकडे मागणी करत आहेत. तर दुसरीकडे संस्थाचालक सुद्धा शाळा सुरु होण्याची वाट पाहत आहेत. सामाजिक प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक स्तरावरून चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास, मानसिक विकास अपुरा होऊ नये म्हणे शाळा सुरु करणं गरजेचं आहे.

विद्यार्थ्यंबाबत निर्णय होतो पण त्या निर्णयाबाबत पालकांची मते मुलांची मते हे जाणून घेण्यात सरकार अपयशी ठरत आहे का? यावर बच्चू कडू-

15 टक्के फी कपातीबाबत शासनाकडून शिक्षकांमध्ये फरक का ?

-खाजगी शाळा म्हणजेच या शाळेचं भविष्य आहे. खाजगी शाळेचं सर्व चांगलं आहे. आणि याउलट अनुदानित शाळेचं सरकार बेकार, सरकारी शाळेचं शिक्षण बेकार हे जे स्वतःच्या मानाने तर्क लावणे हे चुकीचं आहे. 50-60% विद्यार्थी अजूनही सरकारी शाळेत शिकतात.

मुलांच्या मानसिक, शारीरिक विकासाकडे लक्ष आहे का?

- कोरोनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर तर झालाच आहे. पण आम्ही वर्षा गायकवाड यांच्यासोबत दोन बैठक घेतल्या आहेत. एकदा परिस्थिती सुरळीत झाली कि, जे नुकसान झालं आहे ते भरून काढायच. जे गेलेलं शिक्षण आहे ते हातात घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल यावर विचार सुरु आहे.

जर एखाद्या विद्यार्थ्यांचा एक बॅकलॉग राहिला आहे तर त्याला कस सुरळीत करता येईल याचाही आराखडा तयार आहे.

मागच्या इयत्तेतील काही महत्वाचे मुद्दे पुढच्या इयत्तेत घेऊन अभ्यासक्रम देता येणाच्या विचार सुरु आहे. सगळंच शिक्षण न देता महत्वाचं शिक्षण विद्यार्थ्याला कस देता येईल असा ३-६ महिन्याचा वर्ग सुरु करून त्याला शिक्षण देता येईल का याविषयी आराखडा तयार.

परीक्षा पुढे होणारच नाहीत?

परीक्षा या होणारच आहेत. सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यावर परिक्षा होतील. मूल्यांकनाच्या आराखडा तयार आहे. सरकार अडचणीत आहे त्यामुळे शाळा सुरु नाहीत हे चुकीचं आहे.

या सर्व परिस्थिती विद्यार्थ्यंचा विचार?

जसे सणावारीला सगळे एकत्र येतात तसच इथेही टीम वर्क गरजेचं आहे. सगळ्यांनी मनावर घेतला पाहिजे. चळवळ होत नाही तोपर्यंत मळमळ होत नाही. सरकारने मनावर घेतलं पाहिजे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shadashtak Yog: सूर्य-गुरुची अशुभ दृष्टीमुळे ओढावणार 'या' राशींवर संकट; नात्यात टोकाचे वाद होण्याची शक्यता

Bank Job: १५०० रिक्त जागा अन् ८५००० रुपये पगार; यूनियन बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: शिवसेना उमेदवार विजय शिवातारेंकडून आचारसंहितेचा भंग

Maharashtra Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार, ९१ पदाधिकाऱ्यांनी सोडली साध, भाजपचा प्रचार करणार!

Winter Breakfast Ideas : हिवाळ्यात तुमची सकाळ होईल गोड; १० मिनिटात बनवा टेस्टी अन् हेल्दी ब्रेकफास्ट

SCROLL FOR NEXT