Mumbai Rain Update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain Update : पुण्यानंतर मुंबईला पावसाने झोडपलं; रस्ते जलमय, अर्ध्या तासातच मुंबईकरांची उडाली दैना

mumbai Rain update in Marathi : पुण्यानंतर मुंबईत पावसाची एन्ट्री झाली आहे. मुसळधार पावसामुळे अर्ध्या तासातच मुंबईकरांची दैना उडाली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : पुण्यानंतर मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री झाली आहे. ऐन उन्हाळ्यात अचानक बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली. अर्ध्या तासाच्या पावसाने मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत. काही भागात रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचलं आहे. मात्र, या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील उकाड्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, मागील तासाभरापासून मुंबईतील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या दिलासा मिळाला. पश्चिम उपनगरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला.

मुंबईच्या दहिसर पूर्व येथील एस वी रोड, शिवाजी रोड, पेट्रोल पंप परिसरातील रस्ते जलमय झाले. अर्ध्या तासांतच पावसामुळे रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई उपनगरातील भांडुप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर या विभागात सरी बरसल्या.

मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी मार्केट, कांदिवलीतील गांधी नगर भाजी बाजारात पाणी भरलं. या पाण्यातच वाट काढत नागरिकांना घर गाठावं लागत आहे. मुंबई पश्चिम उपनगरमधील बांद्रा या विभागात पावसाला कोसळत आहे. या पावसामुळे अंधेरीतील सबवे बंद झाला. तर काही भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

नवी मुंबई आणि पनवेलमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

नवी मुबंईतील पनवेल परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. पनवेल, कळंबोली आणि खारघर परिसरात विजेच्या कडकडाटात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झालीय. तर नवी मुंबईतील बेलापूर, नेरुळ, वाशी परिसरात वीज चमकत मेघ गर्जनेसह पावसाच्या सरी बरसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras 2025: आज धनत्रयोदशी आणि शुभ ग्रहयोग! खरेदी, गुंतवणूक आणि भाग्य उघडण्यासाठी सर्वोत्तम दिवस

Gopichand Padalkar : हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य, भाजप नेते पडळकर नेमकं काय म्हणाले?

Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : ठाकरेंची नवी युवा पिढी एकाच फ्रेममध्ये

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

SCROLL FOR NEXT