PRAYAGRAJ CASH SEIZURE saam tv
मुंबई/पुणे

घरात जमिनीखाली पुरले नोटांचे निळे ड्रम्स, प्रयागराजमधील कॅशचं पुणे कनेक्शन?

Rs 4 Crore Cash Found Buried Underground in UP Village: उत्तर प्रदेशातील एका गावात चक्रावून टाकणारा प्रकार समोर आलाय. गावातील एका घरात जमिनीखाली पैशांनी भरलेले ड्रम्स सापडलेत. मात्र, या बेहिशेबी संपत्तीचा भांडाफोड कसा झाला?... या प्रकरणाचा तपास करत पोलीस महाराष्ट्रापर्यंत कसे पोहोचले?... पैशांनी भरलेल्या निळ्या ड्रमचं महाराष्ट्र कनेक्शन पाहूयात या रिपोर्टमधून...

Rohit Kadam

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील नवाबगंजमधल्या गावातील एका कुटुंबाच्या घराखाली कॅशनं भरलेले निळे ड्रम्स सापडले. एक दोन नव्हे तर चक्क तीन ड्रम्समध्ये 500 रुपयांची बंडल मिळून 4 कोटींची रक्कम असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलीसांनी ाकेश यादव आणि राजेश यादव या दोघा भावांना अटक केलीये. मात्र चौकशीत या बेहिशेबी पैशांच पुणे कनेक्शन समोर आल्यांन एकच खळबळ उडाली.

हे प्रकरण कसं बाहेर आलं तर राजेश यादव महिंद्रा थार ही गाडी खरेदी करणार होता. भाऊ राकेशचा याला विरोध होता. यावरून दोघा भावांमध्ये जोरदार वाद झाला आणि संतापाच्या भरात राकेशनं पोलिसांना पैशांबद्दल सांगून टाकलं. त्यावरून पोलिसांनी छापा टाकला आणि ही बेहिशेबी कॅश समोर आली.

राकेश यादव आणि राजेश यादव पूर्वी महाराष्ट्रातील पुणे शहरात एका सोन्याच्या व्यापाऱ्याकडे काम करत होते. देशभरात कोरोना पसरला तेव्हा त्यांनी नोकरी सोडली आणि पुण्याहून आपल्या गावी परतले. गावात परतल्यानंतरच त्यांनी कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली, आलिशान घर बांधलं, दोन ट्रॅक्टर, एक पिकअप आणि एक बोलेरो खरेदी केली ..तसंच डीजे आणि सिमेंटचा व्यवसायही सुरू केल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालंय

दरम्यान, आयकर विभाग आणि बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकांसह स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. इतकंच नव्हे तर या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक पोलिसांचं एक पथक पुण्यातही पाठवण्यात आलंय. आता या बेहिशेबी रुपयांच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयागराज पोलीस थेट पुण्यापर्यंत येऊन पोहोचलेत. पुणे पोलिसांना प्रयागराजमधील बेहिशेबी पैशांच्या प्रकरणाच्या कारवाईबद्दल कुठलीही माहिती नसल्याचं कळतंय. त्यामुळे यादव बंधूंकडे हे पैसे कुठून आले.. बेहिशेबी पैसे आणण्यात आणि लपवण्यात कोणत्या बड्या धेंड्यांचा सहभाग आहे का...?... हा निळे ड्रम्स आणि त्यातल्या रोख पैश्यांची पाळमुंळं पुण्यात आहेत का..या सगळ्याची उत्तर आता पोलीस तपासातूनच समोर येतील...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभा निवडणुकीआधी ५ राज्यात मोठी घडामोड; SIR नंतर घटले २.२९ कोटी मतदार, युपीत किती मतदारांचं नाव झालं रद्द?

Maharashtra News Live Update: १३.९६ कोटींच्या RTGS घोटाळ्यातील आरोपीला अटक

Fact Check: केंद्र सरकारकडून 8 हजारांचं दिवाळी गिफ्ट? अर्ज भरलेल्यांनाच मिळणार योजनेचा लाभ?

बाथरूम- टॉयलेटमध्ये तुम्हीही या 7 चुका करताय, वेळीच व्हा सावध नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

सुनेत्रा पवारांना वगळून NCP नेते शाहांच्या भेटीला; वळसे पाटील, मुंडेंचं मंत्रिमंडळात 'कमबॅक' होणार?

SCROLL FOR NEXT