''भावी सहकारी'' मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचं दरेकरांकडून स्वागत Saam Tv News
मुंबई/पुणे

''भावी सहकारी'' मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचं दरेकरांकडून स्वागत

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्याचं स्वागत केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपचे ज्येष्ठ मंत्री तथा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भावा सहकारी म्हणून संबोधले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्याचं स्वागत केलं आहे. (Pravin Darekar welcomes the statement of the CM Uddhav Thackeray)

हे देखील पहा -

प्रवीण दरेकर म्हणाले की, मला वाटतं उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं असेल तर त्याचं स्वागत आहे. त्याबद्दल नाक मुरडण्याचं काही कारण नाही, मुळात महाविकास आघाडी हे अनैसर्गिकरीत्या आहे. शिवसेना-भाजप यांची पुर्वीपासून मैत्री आहे. परंतु भारतीय जनता पार्टीत अद्यापतरी असा निर्णय झालेला नाही. याच्यामागे हाही संदेश असू शकतो की, आम्ही भाजपसोबत जाण्यास मोकळे आहोत. एकमेकांच्या सभापतींवर अविश्वास आणला जातो यामुळे तुम्ही शिस्तीत वागा अन्यथा भापजसोबतचा पर्याय आहे असा संदेश मुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांना द्यायचा असेल म्हणूनही हे वक्तव्य केले असावे असं दरेकर म्हणाले.

दरम्यान शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार की नाही याबाबत कुणीही स्पष्ट बोलत नसलं तरीही दोन्ही पक्षांकडून युतीची शक्यताही नाकारण्यात आलेली नाही. अनेकदा दोन्ही पक्षातील काही नेत्यांनी पुन्हा युती होणे अशक्य नाही अशी वक्तव्ये केली आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातला अंतर्गत संघर्ष सहज लक्षात येतो.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT