...आता तुम्ही ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा - प्रवीण दरेकर Saam Tv
मुंबई/पुणे

...आता तुम्ही ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा - प्रवीण दरेकर

शेतकऱ्यांसाठी काळा दिवस म्हणावा लागेल कारण तीन चांगले कायदे मागे घ्यावे लागले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा देशवासियांना संबोधित करत असताना केली. या घोषणेनंतर देशभरातून केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर देशभरातून वेगवेळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. काही वेळेपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आणि केंद्र सरकारवर टीका देखील केली. संजय राऊत म्हणले की, केंद्र सरकारने हे आधीच आंदोलन मागे घेतले असते तर 450 शेतकऱ्यांचे मृत्यू झाले नसते, यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यावेळी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जी टीका केली त्याला प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील एसटी कर्मचारी सुद्धा आंदोलन करत आहेत, तो कर्मचारी न्याय मागत आहे. मृत्यूचा आकडा वाढू नये असं वाटत असेल तर कुठलाही अहंकार न बाळगता ST कर्मचाऱ्यांचा विलीकरणाचा प्रश्न असाच मार्गी लावावा. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणे हे कामगारांचं आंदोलन होऊ नये असं वाटत असेल तर त्यांचा प्रश्नावर सुद्धा तोडगा काढा असं ते यावेळी म्हणाले आहे.

पुढे ते म्हणाले, मोदींनी कृषी कायदा रद्द करून शेतकऱ्यांचा सन्मान केला. संजय राऊत यांचा शेतीशी काही संबंध नाही. तुम्हाला प्रत्येक निर्णयात राजकारण दिसत असेल तर काय म्हणावे? हा मोदी साहेबानी शेतकऱ्यासाठी निर्णय घेतला. निर्णयाचे विरोधकांनी स्वागत करावे.

आंदोलनाची हवा आता कमी झाली आहे. मोदींनी विकासाच्या दृष्टीने मोदींनी निर्णय घेतला आहे. अजित दादांनी प्रतिक्रिया दिली बाकी सर्वांनी झुकली वैगरे म्हणत आहेत. आम्ही शेतकऱ्यांना कायदा समजून सांगण्यात अपयशी ठरलो आहोत असे ते म्हणाले.

आपल्या प्रतिष्ठपेक्षा शेतकऱ्यांच्या भूमिकेला नरेंद्र मोदी यांनी समर्थन दिले आहे. पण आज शेतकऱ्यांसाठी काळा दिवस म्हणावा लागेल कारण तीन चांगले कायदे मागे घ्यावे लागले. शरद जोशी यांनी ज्या कायद्यांसाठी आयुष्य खर्च केलं होतं ते निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतले होते. आज त्यांचा आत्मा अस्वस्थ झाला असेल. निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने निर्णय घेतला का? विरोधकांचा हा आरोप म्हणजे "गिरे तो भी टांग उपर" असा आहे. चांगला निर्णय घेतला तरी मोदी द्वेष दाखवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

SCROLL FOR NEXT