'राजकारणात काहीही होऊ शकतं; भाजप- मनसे युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील' Saam TV
मुंबई/पुणे

'राजकारणात काहीही होऊ शकतं; भाजप- मनसे युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील'

परळीमध्ये मंत्र्यांच्या स्वागताला फटाके फोडून शेतकऱ्यांची चेष्टा लावली असल्याचं वक्तव्य दरेकरांनी केलं आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: राज्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहीर केली नाही, वडेट्टीवार यांनी दोन दिवसात मदत जाहीर करू असं सांगितलं पण अजून मदत दिलेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधी पक्षाची मागणी असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले. एका बाजूला शेतकरी दुःखात आहे, पण परळीमध्ये मंत्र्यांच्या स्वागताला फटाके फोडून शेतकऱ्यांची चेष्टा लावली असल्याचं वक्तव्य दरेकरांनी केलं आहे.

भाजप मनसे युती?

भाजप मनसे युतीबाबत बोलताना दरेकर म्हणाले ''राजकारणात ज्या दिवशी उध्दव ठाकरे काँगेससोबत गेले, हिंदुत्ववाशी नाळ तोडली, ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना तुरुंगात टाकलं, आता काँग्रेस सोबत मांडीला मांडी लावून बसतात त्यावरून माझ्या सारख्या कार्यकर्त्याचा समज आहे की राजकारणात काहीही होऊ शकतं मात्र मनसे भाजप युती बाबत अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही, वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील.

फडणवीस सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट

जलयुक्त शिवार योजनेबाबत बोलताना दरेकर म्हणाले संकटाच्या काळात राजकीय भूमीका नको. जलयुक्त शिवारमुळे पाण्याची पातळी राखली गेली, योग्य नियोजन झाले. फडणवीस सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता, मात्र जलयुक्त शिवार ला बदनाम करण्यासाठी मिळेल ते संधी सरकार बघत आहे. तौक्ते वादळामुळे झालेलं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही, केवळ घोषणा होतात पण मदत मिळत नाही अशी टीका दरेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदत शेतकऱ्यांच्या अकाऊंटला जमा करावी अशी विनंतीही दरेकरांनी केली आहे.

आमचे नगरसेवक दिवस रात्र काम करतात

काही दिवसांपुर्वी संजय राऊत पुण्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये शिवसेनेचा एकहाती सत्ता स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला प्रतिउत्तर देताना दरेकर म्हणाले, ''निवडणुकीच्या तोंडावर लक्ष घालून काही होत नसतं, 5 वर्ष आमचे नगरसेवक दिवस रात्र काम करत आहेत. पुणेकरांना विकास फक्त आम्ही देऊ शकतो. त्याचबरोबर तीन सदस्यीय प्रभागाचा भाजपला फायदा होईल असाही विश्वास दरेकरांना व्यक्त केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT