Praja Foundation Report On Mumbai MLA Performerce:  Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai MLA Report: मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जारी! काँग्रेस, ठाकरे गटाची दमदार कामगिरी; प्रजा फाऊंडेशनचा अहवाल, वाचा सविस्तर...

Praja Foundation Report On Mumbai MLA Performerce: प्रजा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने सादर केलेल्या अहवालामध्ये आमदारांची कामगिरी घटल्याचे निदर्शनास आले आहे. पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेसने पहिला क्रमांक पटकावला आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड| मुंबई, ता. २१ ऑगस्ट २०२४

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच २०१९ ते २०२४ या काळातील विधानसभेच्या मुंबईमधील आमदारांच्या कामगिरीचा एक महत्वाचा अहवाल समोर आला आहे. प्रजा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने सादर केलेल्या अहवालामध्ये आमदारांची कामगिरी घटल्याचे निदर्शनास आले आहे. पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेसने पहिला क्रमांक पटकावला आहे. काय आहे प्रजा फाऊंडेशनचा खास रिपोर्ट? वाचा सविस्तर..

काय आहे प्रजा फाऊंडेशनचा रिपोर्ट!

२०१९ ते २०२४ च्या विधानसभेच्या आमदारांच्या कामगिरीत घट झाल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच १२ व्या विधानसभेच्या तुलनेत १४ व्या विधानसभेतील कामकाजात ४३ टक्क्यांची घट झाली आहे. १२ व्या विधानसभेच्या म्हणजेट २००९ ते २०२४ या कार्यकाळात 210 दिवस कामकाज चालले आहे. जे चालू 14 व्या विधानसभेत (हिवाळी सत्र २०१९ ते अर्थसंकल्पीय सत्र २०२४ यामध्ये ११९ दिवस कामकाज झाले.

काँग्रेसचीच कामगिरी दमदार

विधानसभेचे काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी ८२. ९२ टक्के कामगिरी करत पहिली श्रेणी मिळवली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू ७८. ७१ टक्क्यांसह दुसऱ्या श्रेणीत तर आमदार वर्षा गायकवाड यांनी ७६. ५१ टक्क्यांसह तिसरी क्षेणी मिळवली आहे. या तीन आमदारांनीआपल्या संविधानिक जबाबदाऱ्याचे भान राखत सभागृहातील कामगिरी बजावली. तर चालू विधानसभेच्या काळात मुंबईतील 34 आमदारांपैकी एका आमदारानेच 80 टक्केच्या वर गुण मिळवले आहेत.

दरम्यान, आमदारांच्या कामगिरीवरून जर राजकीय पक्षांचा कामगिरीचा विचार केला तर काँग्रेस 72.56 टक्क्यांसह पहिल्या स्थानी आहे. भारतीय जनता पक्ष 60 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. 13 व्या विधानसभा सत्राच्या कामगिरीच्या तुलनेत 14 व्या विधानसभेची कामगिरी चिंताजनक आहे. कारण या विधानसभेच्या काळात कोरोना आल्यामुळे कामकाज कमी झाले आहे असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT