posco, navi mumbai latest Marathi news, Navi Crime News Updates , Bethel Gospel Pentecostal Church SaamTV
मुंबई/पुणे

नवी मुंबईत राजस्थानातील बहिणींचं लैंगिक शोषण; पाेक्साेचे चार गुन्हे दाखल

शहरात वसतीगृह, बालगृह चालवण्यासाठी शासनाकडून अनुमती घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन रेड्डी यांनी केले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Bethel Gospel Pentecostal Church : नवी मुंबईतील (navi mumbai) सीवूडमध्ये असलेल्या बेथेल गोस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट चर्च मधील आणखी तीन मुलींवर लैगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत एनआरआय पोलिसांनी (police) पास्टर राजकुमार येशूदासन (priest rajkumar yesudasan) याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बेथेल गोस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट चर्च मधील सुरु असलेल्या अनधिकृत आश्रम शाळेवर महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी धाड टाकत तेथून 45 मुला मुलींची सुटका केली होती. यापैकी तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्या प्रकरण गेल्या महिन्यात पास्टर राजकुमारवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महिला व बाल विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सर्व मुलांचे काउन्सलिंग केल्यावर आणखी तीन मुलींनी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितलं. त्यानंतर महिला व बालविकास विभागाचे जिल्हा बाल सरंक्षक अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात पास्टर राजकुमार याच्या विराेधात तक्रार दाखल केली. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पास्टर राजकुमार याच्यावर पाेक्साे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरणाची थाेडक्यात माहिती

१. यापूर्वी चर्चमधील बालगृहातून सुटका करण्यात आलेल्या एका १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या महिला अधिकार्‍यांनी ऑगस्ट मासामध्ये एन्.आर्.आय. पोलीस ठाण्यात येशुदासन याच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. त्यामुळे येशुदासन विरोधात आता या प्रकरणात विनयभंग आणि पोक्सो कलमानुसार एकूण ४ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

२. ऑगस्ट महिन्यात जिल्हा बाल संरक्षण समितीने या चर्चवर धाड टाकून ४५ अल्पवयीन मुलांची सुटका केली. यामध्ये १३ मुलींचा समावेश होता. तेव्हापासून येशुदासन अटकेत आहे.

३. या प्रकरणी महिला आणि बाल विकास विभागाने केलेल्या अधिक अन्वेषणामध्ये येशुदासन याने लैंगिक शोषण केल्याची माहिती आणखी ३ अल्पवयीन मुलींनी दिली. यामध्ये १३ आणि १४ वर्षीय २ बहिणींचा समावेश असून त्या राजस्थान येथील आहेत.

४. तसेच एका १० वर्षीय मुलीनेही अशाच प्रकारची माहिती दिली. शहरात वसतीगृह, बालगृह चालवण्यासाठी शासनाकडून अनुमती घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन रेड्डी यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT