IAS Pooja Khedkar Saam Digital
मुंबई/पुणे

Pooja Khedkar Dismissed : मोठी बातमी! IAS पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बडतर्फ; केंद्र सरकारची मोठी कारवाई

IAS Pooja Khedkar News: प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर यांना केंद्र सरकारने प्रशासकीय सेवेतून बरखास्त केलं आहे.

Satish Kengar

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्याबाबत केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकर यांना प्रशासकीय सेवेतून बरखास्त केलं आहे.

केंद्र सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियम, 1954 च्या नियम 12 अंतर्गत पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तत्काळ कार्यमुक्त केलं आहे. यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. याआधी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 31 जुलै रोजी त्यांची उमेदवारी रद्द केली होती आणि त्यांना भविष्यातही परीक्षा देता येणार नाही, असं म्हटलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी 2020-21 मध्ये ओबीसी कोट्यात 'पूजा दिलीपराव खेडकर' या नावाने परीक्षा दिली होती. यानंतर परीक्षा देण्याची मर्यादा संपलेली असतानाही पूजा यांनी ओबीसी आणि पीडब्ल्यूबीडी (दिव्यांग) कोट्याअंतर्गत परीक्षा दिली. तेव्हा त्यांनी 'पूजा मनोरमा दिलीप खेडकर' हे नाव वापरले. त्यावेळी त्यांनी परीक्षा पास करत 821 क्रमांक मिळवला होता.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यूपीएससीने पूजा खेडकर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि त्यांची उमेदवारी रद्द केली. यानंतर पूजा खेडकर यांनी आपली उमेदवारी रद्द करण्याच्या यूपीएससीच्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयासमोर दिलेल्या उत्तरात पूजा खेडकर यांनी दावा केला की, त्यांनी युपीएससीला त्यांच्या नावात कोणताही फेरफार केला नसून त्यांनी कोणतीही चुकीची माहिती दिली नाही. दरम्यान, पूजा खेडकर यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी त्यांचे नाव, पालकांचे नाव, त्यांचे फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून आपली खोटी ओळख निर्माण करत परीक्षेला बसल्या. यातच यूपीएससी नंतर आता केंद्र सरकारनेही त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT