Anand Ashram Political Drama Saam tv
मुंबई/पुणे

Anand Ashram Political Drama : ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर जोरदार राडा; दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने, नेमकं काय घडलं?

thane anand ashram news : ठाण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये राडा झाला. दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली.

Vishal Gangurde

ठाणे : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यातील विविध भागात राजकीय वातावरण तापलं आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आज रविवारी ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यानंतर एकच राडा झाल्याचं दिसून आलं. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली.

ठाण्यात आज ठाकरे गटाचा संवाद मेळावा आहे. ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मोठी फौज पाहायला मिळत आहे. या मेळाव्याआधी संजय राऊत आणि इतर नेते ठाण्यातील सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम या कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

दुसरीकडे ठाकरे गटाला विरोध करण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते जमा झाले. त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. ठाकरे गटाने आनंद आश्रमाजवळील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिघे यांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक केला.

मेळाव्याआधी संजय राऊतांच्या घरी बैठक

ठाण्यातील मेळाव्याआधी संजय राऊत यांच्या घरी ठाकरे गटाचे नेते एकत्र आले होते. यावेळी ठाण्याच्या मेळाव्यात काय मार्गदर्शन असावे,याबाबत चर्चा झाली. संजय राऊत यांच्या घरी अंबादास दानवे, भास्कर जाधव, अरविंद सावंत इत्यादी नेते दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Filler: सिलिब्रिटी लिप फिलर्स करतात म्हणजे नेमंक काय करतात?

Maharashtra Politics : राज ठाकरे - उद्धव ठाकरे इतक्यात एकत्र येतील का? काय आहेत आव्हानं? EXPLAINED

Maharashtra Live News Update:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात पार पडणार रक्तदान शिबिर

Rajeshwari Kharat: 'एक नंबर तुझी कंबर...' राजेश्वरीच्या साडीतील फोटोवरून नजर हटणार नाही

Plane Accident : अहमदाबादसारखी घटना, टेकऑफनंतर विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT