Lip Filler: सिलिब्रिटी लिप फिलर्स करतात म्हणजे नेमंक काय करतात?

Shruti Vilas Kadam

लिप फिलर म्हणजे काय?


लिप फिलर ही एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये ओठांमध्ये विशेष जेलसारखा पदार्थ इंजेक्ट केला जातो, ज्यामुळे ओठ अधिक भरदार, उठावदार व आकर्षक दिसतात.

Lip Filler

हायल्युरोनिक ऍसिडचे उपयोग


बहुतेक लिप फिलरमध्ये हायल्युरोनिक ऍसिड असतो, जो शरीरात नैसर्गिकरित्या आढळतो आणि त्वचेला आर्द्रता देतो.

Lip Filler

वेळ आणि परिणाम


ही प्रक्रिया १५-३० मिनिटांत पूर्ण होते आणि त्याचे परिणाम लगेच दिसू लागतात. संपूर्ण परिणाम २४-४८ तासात स्पष्टपणे जाणवतात.

Lip Filler

तात्पुरते परिणाम


लिप फिलरचे परिणाम तात्पुरते असतात. सामान्यतः हे ६ ते १२ महिन्यांपर्यंत टिकते, त्यानंतर टचअप किंवा री-फिल करावे लागते.

Lip Filler

साइड इफेक्ट्स


सूज, लालसरपणा, गाठी तयार होणे, किंवा वेदना हे सामान्य साइड इफेक्ट्स असू शकतात. अपारिपक्व हाताळणीमुळे गंभीर समस्या होऊ शकतात.

Lip Filler | Saam Tv

डॉक्टरांची सल्ला आवश्यक


लिप फिलर घेण्याआधी अनुभवी त्वचारोगतज्ज्ञ किंवा कॉस्मेटिक सर्जनचा सल्ला घेणे आवश्यक आहे. फसव्या ऑफर्सपासून सावध राहावे.

Lip Filler

नैसर्गिक परिणामांची शक्यता


योग्य प्रमाणात आणि अनुभवसंपन्न तज्ज्ञाकडून केल्यास ओठ नैसर्गिक आणि सौंदर्यपूर्ण दिसतात. अतिरेक केल्यास फेक आणि सुजलेले वाटू शकतात.

Lip Filler

Kareena Kapoor Khan: करीना कपूर खानचा ग्लॅमरस ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

Kareena Kapoor Khan
येथे क्लिक करा