Badlapur News Saam Tv
मुंबई/पुणे

Political News : बदलापूरमध्ये शिंदेंचा भाजपाला दे धक्का! बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

Maharashtra Political News : बदलापुरात स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर होताच मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपचे माजी नगरसेवक अविनाश भोपी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Alisha Khedekar

बदलापुरातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

माजी नगरसेवक अविनाश भोपी यांच्या नेतृत्वाखाली मोठी राजकीय हालचाल

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश मेळावा पार पडला

आगामी स्थानिक निवडणुकांसाठी बदलापुरात मोठी चुरस आणि सत्ता समीकरणांमध्ये बदल

बदलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या पासून प्रत्येक राजकीय पक्षात निवडणुक तयारींच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच आता बदलापूरमध्ये शिंदे गटाने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. शहरातील शेकडो भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेतलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर बदलापूरात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळतीय. दोन्ही पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते पळवत असल्याचं चित्र सध्या शहरात दिसून येतंय. यातच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बदलापुरात शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

या मेळाव्यात भाजपाचे माजी नगरसेवक अविनाश भोपी यांच्यासह शहरातील शेकडो भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजप आता भाजप राहिली नसून जुन्या राष्ट्रवादीने पक्षावर कब्जा केला असल्याची टीका यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारी लागले आहेत. अशातच कोणी पक्षाची साथ सोडतंय तर कोणी नव्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करतं आहेत. दरम्यान आता येत्या या निवडणूकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखांकडे देखील जनतेचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे – अंबादास दानवेंचा सल्ला|VIDEO

Bihar Election Result Live Updates : भाजपच्या मैथिली ठाकूर ९ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Live News Update: पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कामाने प्रभावित झालो-हेमंत वाजे

Actress Passes Away: भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

Best Oil For Heart: हिवाळ्यात हृदयरोगाचा धोका वाढतो? नसा ब्लॉक होण्याची भीती? आहारात कोणते तेल वापरावे? FSSAIने दिली माहिती

SCROLL FOR NEXT