Mumbai News  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Political News : ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार? पक्षातील नव्या नियुक्त्यांवरुन पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

Political News : नाराज असलेले पदाधिकारी येत्या दोन दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी शिवसेनेतीने अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्षाला रामराम ठोकत आहेत. एकीकडे ठाकरे गटाला मुंबईत खिंडार पडायला सुरुवात झाली असताना, दक्षिण मुंबई विभागात ठाकरे गटात अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे.

नाराज पदाधिकाऱ्यांमध्ये माजी नगरसेवक, विधानसभा संघटक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांचा समावेश आहे. काल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून केलेल्या नियुक्त्यांवरून ठाकरे गटाच्या स्थानिक पधादिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे.

विधानसभा क्षेत्रातून वर येणारे नेतृत्व दाबण्यासाठी नवीन पद देण्याचा घाट सुरु असल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांच म्हणणं आहे. (Latest Marathi News)

मुंबईत विधानसभा संघटक हे पद आहे. परंतु कुलाबा विधानसभा क्षेत्रात विधानसभा प्रमुख हे पद निर्माण करून विधानसभा संघटकाला खाली खेचण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (Political News)

उद्धव ठाकरेंची भेट घेणार

काही महिन्यापूर्वीच ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख बदलले आहेत. त्यामुळे देखील स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याच पाहायला मिळत होतं. नाराज असलेले पदाधिकारी येत्या दोन दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

पदाधिकारी आपल्या नाराजाची सर्व माहिती उद्धव ठाकरे यांना देणार आहेत. उद्धव ठाकरे नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात की ठाकरे गटाला दक्षिण मुंबईत नाराज शिवसैनिकांच्या रूपात खिंडार पडतं हे पाहणं महत्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: गोविंदानं केलं दुसरं लग्न? दुसऱ्या पत्नीसोबत गोविंदा राजाच्या दर्शनाला?

Rain Alert : १९ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; अनेक राज्यांना वादळी तडाखा, ताशी ८० किमी वेगाने वाहणार वारे

Swiggy Instamartमध्ये उंदीर अन् झुरळांचा सुळसुळाट! Amazonच्या गोदामासह १० अन्न आस्थापनांवर FDAचा बडगा

Maharashtra News Live Update: खाजगीकरणावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या PA ला १,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; टीप मिळाली अन् ACB ने अलगद टिपला

SCROLL FOR NEXT