Shivsena Sanjay Raut News Saamtv
मुंबई/पुणे

Sanjay Raut on ED Raid : ED च्या धाडीवर संजय राऊतांनी उडी; संतापून बोलले, आमच्यावर बंदुका चालवा, गोळ्या घाला!

ED raid in Mumbai : बीएमसीचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरावरही ईडीची छापेमारी सुरु आहे.

सूरज सावंत

Mumbai News : मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईत धाडसत्र सुरु आहे. ईडीने जवळपास १५ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यामध्ये बीएमसीचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरावरही छापेमारी सुरु आहे.

ईडीनेच्या या कारवाईवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर बंदुका चालवा किंवा गोळ्या घाला आमची घोडदौड सुरूच राहणार असं राऊत यांनी म्हटलं.

ईडीची मु़ंबईत छापेमारी सुरू आहे. शिवसेनेच्या नेत्याच्या घरावरही छापा टाकला आहे. मात्र हे सगळं टार्गेट करून सुरूआहे. पण शिंदे व भाजपमध्ये गेलेल्यांना का वगळलं? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. (Latest Marathi News)

फासे उलटे पडू शकतात

सगळं सुरु आहे ते राजकीय सूडाची कारवाई आहे. मी देखील अशा कारवाईला सामोरे गेलो आहे. भविष्यात सत्ता बदलली तर फासे उलटे पडू शकतात. दादा भुसे यांच्याविरुद्ध १७८ कोटींच्या भ्रष्टाचाराची तक्रार मी दिली आहे.

राहुल कुल यांची ५०० कोटीच्या अपहाराची तक्रार मी केली आहे. त्यांचावर काहीही काहीही कारवाई का होत नाही, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

उद्धव ठाकरेंसोबत असल्याने कारवाई

अब्दुल सत्तार आणि विखेपाटील यांचीही तक्रार करणार आहे. झाकीर नाईक यांच्याकडून विखे पाटलांना फंडिंग झालं आहे, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत, त्यामुळे तुम्ही हे करत असाल तर करत राहा. आमच्यावर बंदुका चालवा किंवा गोळ्या घाला आमची घोडदौड अशीच सुरूच राहणार, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT