Girish Bapat Saam TV
मुंबई/पुणे

Pune Loksabha Byelection: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज? भाजपकडून उमेदवारीसाठी काही नावांची चर्चा

Pune Loksabha Byelection : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती जागा.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक देखील बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपमधील अनेक इच्छुकांनीन निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणूकिसाठी भाजपकडून अनेकांची नावं चर्चेत आहेत. गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संजय काकडे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. (Political News)

पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याचं बोललं जात आहे. जिल्हा निवडणूक विभागाने 17 दिवसांपूर्वी तयारीला सुरुवात केली होती. पुणे लोकसभा मतदारांची एकूण मतदारसंख्या सुमारे १९ लाख ७२ हजार आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची स्थान निश्चिती करणे ही कामे पूर्ण झाली आहेत. (Latest News Update)

कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकहून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पुण्यात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटकची निवडणूक पार पडताच 4,220 EVM मशीन आणि 5,070 व्हीव्हीपॅट मशीन पुण्यात दाखल झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT