Ashok Chavan  Saam Tv
मुंबई/पुणे

Political Explainer : अशोक चव्हाण राज्यसभेवर जाण्याची दाट शक्यता, काय आहे कारण?

Ashok Chavan News Update : अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होताच कोणत्याही क्षणी भाजपची राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होऊ शकते.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशोक चव्हाण  यांना राज्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता सुरुवातीला वर्तवली जात होती. मात्र आता अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी चौथे उमदेवार अशोक असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Latest Marathi News)

अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार?

अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होताच कोणत्याही क्षणी भाजपची राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होऊ शकते. उद्याच अशोक चव्हाण राज्यसभेचा अर्ज भरतील अशीही माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

मात्र राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलेले, राज्याच्या राजकारणाचा मोठा अनुभव असणारे अशोक चव्हाण राज्यसभेवर का जाणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

अशोक चव्हाण राज्यसभेवर जाऊन आपली मुलगी श्रीजया चव्हाण यांना राज्याच्या राजकारणात उतरवू शकतात. मागील वर्षी झालेल्या भारत जोडो यात्रेत भारत जोडो यात्रेत अनेक काँग्रेस नेत्यांना आपल्या मुलांना पुढे केलं होतं. त्यात श्रीजया चव्हाण देखील चर्चेत आल्या होत्या.

मुलीसाठी भोकर मतदारसंघ सोडणार?

अशोक चव्हाण दिल्लीत गेले तर श्रीजया त्यांच्या हक्काच्या भोकर या मतदारसंघातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करु शकतात. शंकराराव चव्हाणांपासून या मतदारसंघात चव्हाण कुटुंबियांचं वर्चस्व राहिलं आहे. चव्हाण कुटुंबियांचा हा बालेकिल्ला मानला जातो. शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, अमिता चव्हाण या मतदारसंघांतून विधानसभेवर गेले आहेत. त्यामुळे श्रीजया या मतदारसंघातून सहज विजय मिळवू शकतात.

केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता

अशोक चव्हाण राज्यसभेनवर गेल्यास भाजपची केंद्रात पुन्हा सत्ता आली तर त्यांना मंत्रिपददेखील मिळू शकता. अशोक चव्हाण यांना प्रशासकीय कारभाराचा मोठा अनुभव आहेत. मुख्यमंत्रिपदाची त्यांना अनुभव आहेत. त्यामुळे भाजपकडून त्यांचा योग्य सन्मान राखला जाऊन शकतो आणि केंद्रात त्यांना काम करण्याची मोठी संधी मिळू शकते.

PWD कडून एनओसी प्रमाणपत्राची मागणी

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनओसी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. 12,300 रुपयांची थकबाकी अशोक चव्हाण यांच्याकडून लगेच भरण्यात आली. घाईघाईची एनओसी घेणं म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.

कारण खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसची एनओसी आवश्यक असते. उमेदवारी अर्जासोबत त्यांना एनओसी द्यावी लागते. पीडब्ल्यूडीने चव्हाण यांना देण्यात आली असून त्याची प्रत नांदेडला पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT