Maharashtra Political News  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : लग्नसमारंभात कल्याण-डोंबिवलीत ३ दिग्गज नेते एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Political News : कल्याण-डोंबिवलीतील एका लग्नसमारंभात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसेचे राजू पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड एकत्र दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

Alisha Khedekar

लग्नसमारंभात तीन दिग्गज नेते एकत्र दिसल्याने सोशल मीडियावर खळबळ

व्हिडीओ व्हायरल होताच राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण

हा फक्त सामाजिक समारंभातील अनौपचारिक भेट असल्याचे सूत्रांचे म्हणणे

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अधिक चर्चेत

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

कल्याण-डोंबिवली परिसरात एका लग्नसमारंभात राजकीय गटांचे दिग्गज नेते एकत्र पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसेचे नेते राजू पाटील आणि शिवसेना (शिंदे गट) संपर्क प्रमुख महेश गायकवाड हे तिघेही एका मंचावर दिसले असून त्यांच्या हलक्या-फुलक्या गप्पांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लग्न समारंभात अनौपचारिक वातावरणात झालेल्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरचे हसू, हातवारे आणि निवांत बोलण्याची शैली पाहता नक्की काय चर्चा झाली?असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

सद्या महापालिका निवडणुका, स्थानिक संघटनात्मक समीकरणे आणि विविध राजकीय घडामोडींमुळे वातावरण तापलेले असताना हे दृश्य अधिकच लक्षवेधी ठरले आहे. मात्र हा औपचारिक राजकीय बैठकीचा प्रसंग नसून, सामाजिक समारंभात झालेली साधी-सरळ भेट असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, विरोधी गटातील नेते एकत्र आल्याने सोशल मीडियावर मीम्स, कमेंट्स आणि तर्क-वितर्कांचा पूर आला आहे. काहींनी ही राजकीय मैत्रीची झलक म्हणून पाहिले तर काहींनी नव्या समीकरणांची चाहूल असा विश्वास व्यक्त केला आहे. नेमकी चर्चा काय झाली? याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी या व्हिडीओने कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात नवा रंग भरला आहे, एवढे मात्र नक्की

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar death News LIVE Updates : असे नेतृत्व पुन्हा होणे नाही...; अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना प्रणिती शिंदे भावूक

Ajit Pawar Political Journey: 1991 ते 2026, दादांनी कोणकोणती पदे सांभाळली? जाणून घ्या अजित पवारांचा राजकीय प्रवास!

Maharashtra Live News Update: आज आणि उद्या पुणे शहर राहणार बंद!

Anil Deshmukh emotional: दादांच्या निधनाची बातमी कळताच अनिल देशमुखांना अश्रू अनावर

Ajit Pawar Death : "दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे..."; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भाजप खासदार कंगना रणौत भावुक

SCROLL FOR NEXT