Pune NCP Ajit Pawar Big Announcement ZP Election Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : अजित पवारांची झेडपीची तयारी, निवडणुकीआधी मारला मास्टरस्ट्रोक, पुण्यात १, २ नव्हे तर ३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

Pune NCP Ajit Pawar Big Announcement ZP Election : राज्यात महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाने मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी पुणे ग्रामीणमध्ये ३ जिल्हाध्यक्ष नियुक्त करत मोठी रणनीती आखली आहे.

Alisha Khedekar

  • महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा मोठा राजकीय निर्णय

  • प्रदीप गारटकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली

  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात तालुके विभागून ३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

  • आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर रणनीतीचा प्रभाव

सागर आव्हाड, पुणे

राज्यात २९ महापालिकेच्या निवडणुकांची धुमाळी सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी थेट पक्षाच्या सदस्यत्वासह जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक झाल्यानंतर मात्र प्रदीप गारटकर पुन्हा अजित पवारांसोबत एकत्र येतील, अशी चर्चा होती. परंतु आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाने राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महत्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यातील गड राखून ठेवला आहे. हीच सत्ता आगामी काळातही अबाधित राखण्यासाठी अजित पवारांनी मास्टर प्लॅन बनविला असून त्याअंतर्गत आता पुणे जिल्ह्यात पक्षाचे एक दोन नाही, तर तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.

अजित पवार यांनी बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांची जबाबदारी संभाजी नाना होळकर यांच्याकडे सुपूर्त केली आहे. होळकर हे अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत काम करत असून पक्षफुटीच्या काळातही ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांसोबत एकनिष्ठ राहिले आहेत. जवळपास तेरा वर्षांहून अधिक काळ होळकर हे बारामती तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

तसेच शिरूर, जुन्नर, खेड आणि आंबेगाव या तालुक्यांची जबाबदारी राजेंद्र कोरेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि पक्ष संघटनेत सक्रीय कार्य करणारा नेता नव्हे कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. तर राजगड, भोर, मुळशी आणि मावळ या तालुक्यांची जबाबदारी अजित पवार यांनी विठ्ठलराव शिंदे यांना दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, अजित पवार आणि आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू असलेले विठ्ठलराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुणे जाणते नेतृत्व आहे. संभाजी होळकर, राजेंद्र कोरेकर आणि विठ्ठलराव शिंदे या तिघांवर तालुका विभागून पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदांची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आणि पक्ष संघटनेची जबाबदारी या तिघांवर असणार आहे. दरम्यान अजित पवार यांनी टाकलेल्या या फास्यांमुळे पुण्यात गेले अनेक वर्षे सुरु असलेली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) यांची सत्ता कायम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hrithik Roshan Birthday : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत स्टार किडची संपत्ती किती? जगतोय लग्जरी लाइफस्टाइल

BMC ELection : 'व्होट बँक' की शहरावर कब्जा? मुंबईची लोकसंख्याशास्त्रीय ओळख पुसण्याचा डाव

Kitchen Hacks : भाजीसाठी लागणारे वाटण जास्त काळ ताजे कसे ठेवावे? जाणून घ्या टिप्स

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT