Kalyan Ddombivli Municipal Corporation News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli : केडीएमसीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत;महापौर, उपमहापौर बिनविरोध, तरीही महासभा का नाही? कुणाचा दबाव?

KDMC Mayor News : कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर निवडूनही महासभा न झाल्याने राजकीय वाद पेटला आहे. बजेट चर्चेला विलंब होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Alisha Khedekar

  • महापौर निवडूनही केडीएमसी महासभा अद्याप आयोजित नाही

  • बजेट चर्चेला विलंब झाल्याने विकासकामांवर परिणाम होण्याची भीती

  • विरोधकांचा प्रशासनावर दबाव व आंदोलनाचा इशारा

  • स्थायी समिती व सदस्य नियुक्त्यांबाबतही स्पष्टीकरणाची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण डोंबिवली

Kalyan Dombivli Municipal General Body Meeting Delay कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका होऊन महापौर देखील ठरला, तरीही अद्याप नवनिर्वाचित नगरसेवकांची महासभा अद्यापही झालेली नाही. ही सभा २० फेब्रुवारीपर्यंत घेणे अपेक्षित होते, मात्र महायुतीला स्पष्ट बहुमत त्यानंतर बिनविरोध महापौर उपमहापौर निवड झाल्यानंतर ही अद्यापही महासभेची तारीख स्पष्ट न झाल्याने आता शिवसेना उभा ठाणे आक्रमक पवित्रा घेतला आहे.

इतर महापालिकांमध्ये महासभेचे आयोजन करून बजेटवर सखोल चर्चा करत शहराचा विकास कामांना चालना देण्यात आली, मात्र कल्याण डोंबिवलीत अद्यापही महासभेचे आयोजन करण्यात आलेले नाही. महासभेचे आयोजन करून पुढील वर्षाच्या बजेटवर चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही महासभेचे आयोजन केलं नाही त्यामुळे बजेटवर चर्चा न झाल्याने याचा परिणाम पुढील वर्षाच्या विकास कामांवर होऊ शकतो. असा आरोप उभाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी केला आहे.

कोणाच्या दबावामुळे महापौर महासभा घेण्यास विलंब होतो आहे? असा सवाल देखील बोरगावकरांनी उपस्थित केला आहे . महासभेचे आयोजन कधी याचा २८ तारखेपर्यंत खुलासा द्या ,अन्यथा केडीएमसी मुख्यालयावर ढोल ताशांच्या गजरात जनजागर लोकशाहीचा जनआदोलन करण्यात येईल. असा इशारा उबाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी महापौर उपमहापौर आयुक्तांना दिला आहे.

कोकण विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या ११९ सदस्य संख्येप्रमाणे बलाबलानुसार स्थायी समिती सदस्य तसेच स्वीकृत सदस्य नियुक्त करणार का? याबाबत स्पष्टीकरण देण्याचे मागणी देखील बोरगावकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मोठी बातमी! २६ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

Fish bone in throat: माशाचा काटा घशात अडकला, संसर्ग वाढत गेला आणि अचानक हार्ट अटॅक; डॉक्टरांच्या मेहनतीने रूग्णांचा वाचला जीव

Maharashtra News Live Update: सिव्हिल ड्रेसवरील लोकांकडे पोलिसांकडे काठ्या कशा, उद्धव ठाकरेंचा सवाल

Mumbai Local : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता दर २ मिनिटांनी धावणार लोकल, काय आहे रेल्वेचा नवा प्लान?

Delhi Protest: दिल्लीत संसदभवन परिसरात आंदोलन, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT