Pune Police Commissioner On Pub Times of India
मुंबई/पुणे

Pune Pub: आता पब १.३०नंतर सुरू राहिले तर...; पोलीस आयुक्तांचा पब चालकांना इशारा

Pune Police Commissioner On Pub: पुणे पोलिसांचा पुण्यातील पब संस्कृतीला विरोध नाहीये. पब सध्या एन्टरटेन्मेंटच एक साधन आहे, पण या पब वर काही निर्बंध पाहिजेत.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुणे शहरातील बेशिस्त पब आणि हॉटेल चालकांना चाप लावण्यात येणार आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्या पब चालकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसलीय. आता यापुढे रात्री १.३० वाजेपर्यंत पब चालू ठेवली जातील. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय.

पोलीस आरोग्य मित्र फाऊंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळ आयोजित "कॉफी विथ सी पी" या कार्यक्रमात पोलीस आयुक्त बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून पोलिसांच्या कार्यावर प्रश्न केली जात आहेत. अशात ख्रिसमस आणि थर्टी फस्ट येत असल्यानं शहरातील सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झालीय.

शहरातील पब संस्कृतीवर आपला विरोध नाही पण त्यावर निर्बंध असणं आवश्यक आहे. त्यामुळे आता यापुढे पुण्यात वेळेचं भान न ठेवणाऱ्या पब चालकांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान पोर्श कार केस प्रकरणानंतर पुण्यातील अवैधरित्या चालू असलेल्या पब आणि हॉटेल्स महापालिकेच्या रडावर आल्या होत्या. पोर्श कारनंतर कॉझी बार, तसेच कोरेगाव परिसरातील दोन पबवर पुणे महानगरपालिकेने कारवाई केली होती.

याप्ररणी बोलताना पुणे पोलीस आयुक्त म्हणाले, पोर्श केसनंतर सांस्कृतिक बॉम्बिंग झालं. एक वेगळा नॅरेटिव्ह सेट झाला. तर या प्रकरणानंतर आता मुलं वडिलांकडून गाडी मागायला घाबरतात. कारण त्यांना माहिती आहे की, एका मुलाने २ जणांचा जीव घेतला आणि त्याचे आई-वडील आज जेलमध्ये सडत आहेत.पुणे पोलीस शहरातील पब संस्कृतीविरोधात नाहीये. पब सध्या एन्टरटेन्मेंटच एक साधन आहे.

पण या पबवर काही निर्बंध पाहिजेत. त्यामुळे आता पुण्यातील पब १.३० नंतर सुरू राहिले तर फक्त आम्ही कारवाई करणार नाहीत पण आयुष्भर त्यांना आर्थिक दणका देऊ, असा इशारा पुणे पोलिसांनी अवैधरित्या रात्रीच्यावेळी पब चालू ठेवणाऱ्यांना दिला. दरम्यान पुण्यातील काही हॉस्टेल आमच्या रडारवर आहेत. जुलै महिन्यात एका पबमध्ये झालेल्या एका फ्रेशर पार्टीनंतर हे लक्षात आलं आहे. हॉस्टेलसाठी सुद्धा नियमावली याबद्दल आम्ही नक्की तयार करू असेही पोलीस आयुक्त म्हणालेत.

पुण्यातील वाहतूक कोंडी संदर्भात आम्ही रोज मॉनिटरिंग करतोय. सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ चौक याबाबत २८ फेब्रुवारी पर्यंत विद्यापीठ चौक बॅरिकेड्स फ्री करा असे आम्ही मेट्रो आणि संबंधित प्रशासनाला सांगितलं आहे. गणेशखिंड, विद्यापीठ चौकात २८ फेब्रुवारी नंतर वेगळं चित्र पाहायला मिळेल. रस्त्यावरू विरुद्ध दिशेने येणाऱ्यांची गाडी जप्त करण्याची कारवाई पुणे पोलिसांकडून सुरू आहे. ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. पुणे शहरात कोणी असं केलं तर आयुष्भर त्यांच्या लक्षात राहील अशी कारवाई आम्ही करत असल्याचेही पोलीस आयुक्त म्हणाले.

पुण्यातील अनेक रस्त्यावर लाईट कमी आहेत, ज्या ठिकाणी लाईट आहेत पण त्यांचे व्होल्टेज कमी आहे. आम्ही पुणे महापालिकेला सुद्धा यासंबंधात सांगितलंय. पुणे पोलिसांनी काही दुर्गम भाग ओळखले आहेत. पुण्यातील घाट आणि टेकड्यांवर पॅनिक बटन, मोबाईल कनेक्टिव्हिटी, सीसीटीव्ही या संदर्भात आम्ही प्रस्ताव पाठवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT