Police sub inspector sends obscene photos to a married woman Victim Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Police: पीडित विवाहितेलाच पोलिस उप-निरीक्षकाने पाठवले अश्लील फोटोज्; मुंबई पोलिसांच्या वर्दीला डाग...

Mumbai Police Crime News: बहिणीला होणाऱ्या त्रासामुळे त्याने पाटणकर यांच्याशी चर्चा करून मदत करण्याची विनंती केली आणि बहिणीला पाटणकर यांचा नंबर देऊन त्यांना फोन करण्यास सांगितले.

सुरज सावंत

मुंबई: 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असा या वाक्याचा अर्थ होतो. मात्र याच ब्रीदवाक्याला काळीमा फासणारी गोष्ट मुंबई पोलिस दलातील (Mumbai Police Force) एका उप-निरीक्षकाने (sub-inspector) केली आहे. पीडित विवाहित महिलेच्या मोबाईलवर या पोलिस उप-निरीक्षकाने मध्यरात्री अश्लील मेसेज आणि फोटो (obscene messages and photos) पाठवल्याचा आरोप पीडित (Victim) महिलेने केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या वर्दीला डाग लागला आहे. (Police sub-inspector sends obscene photos to a married woman; Stains on Mumbai Police uniform ...)

हे देखील पहा -

गोवंडीच्या (Govandi) शिवाजीनगर परिसरात राहणारी २४ वर्षीय तक्रारदार मुलीने काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नानंतर होणाऱ्या घरगुती वादामुळे ती माहेरी निघून आली होती. त्यामुळे नवऱ्याकडून तिला वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. याची माहिती मुलीने तिच्या भावाला दिली, तिचा भाऊ हा एसी सर्व्हिसिंगचे काम करत असून त्याची ओळख पोलिस उपनिरीक्षक शंकर पाटणकर (Shankar Patankar) याच्याशी झाली. बहिणीला होणाऱ्या त्रासामुळे त्याने पाटणकर यांच्याशी चर्चा करून मदत करण्याची विनंती केली आणि बहिणीला पाटणकर यांचा नंबर देऊन त्यांना फोन करण्यास सांगितले.

पीडितेने पाटणकर यांना संपर्क करून मदत मागितली. मार्च २०२२ रोजी शंकर यांनी बोलताना अश्लील संभाषण केले. तसेच शंकर यांनी पीडितेच्या मोबाईलवर मध्यरात्री अश्लील मेसेज व फोटो पाठवल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी संबधित पोलिस उप-निरीक्षक शंकर पाटणकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली असून या आरोपांमागची सत्यताही पोलिस पडताळून पहात आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा 'हा' धक्कादायक परिणाम नक्की वाचा

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

SCROLL FOR NEXT