पोलीस असल्याचे भासवून एसटी प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटले ... सागर आव्हाड
मुंबई/पुणे

पोलीस असल्याचे भासवून एसटी प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटले ...

पाटस ता. दौंड याठिकाणी पोलीस असल्याचे, भासवून एसटी मधील ४ प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटण्यात आले आहे.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पाटस : पाटस Patas ता. दौंड Daund याठिकाणी पोलीस Police असल्याचे, भासवून एसटी ST मधील ४ प्रवाशांचे passengers सव्वा कोटी रुपये लुटण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी मध्य रात्रीच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे. निलंगा- भिवंडी Bhiwandi या एसटी मधून कुरियर Courier सर्व्हिस करणारे हितेंद्र जाधव रा. वाघोशी, ता. फलटण, विकास बोबडे, तेजस बोबडे, संतोष बोबडे हे तिघेही रा. फलटण, जि. सातारा हे चौघेजण प्रवास करत होते.

त्यांच्याकडून १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रुपये किमतीची लूट करण्यात आली आहे. एसटी पाटस येथील ढमालेवस्ती Dhamalevasti परिसरात रात्री १ वाजण्याच्या सुमारास आली असता. या एसटीला चौघांनी अडवले होते. त्यांच्या हातात काठ्या, खाकी पँट परिधान केलेले आणि पायात बुट असा पेहराव असल्याने, बस चालकाला ते पोलीस असल्याचे निदर्शनास आल्याने चालक हा बस थांबवली होती.

हे देखील पहा-

कंडक्टरने दरवाजा उघडताच या चौघांनी काठ्या आपटत पोलिसांच्या तोऱ्यात शिवीगाळ करुन कुरियरवाले कोण आहे, असे म्हणत बसमध्ये पाठीमागे बसलेले चौघेजण उभा राहिले. तेव्हा त्यांच्या शर्टच्या कॉलर पकडत त्यांना एसटीमधून बाहेर काढले आणि एसटी चालकाला जायला सांगितले. एसटी गेल्यावर या चौघांना मारहाण करत त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि मेटल हिसकावून घेतले आणि २ दुचाकी वाहनावावरुन चोरटे पळून पसार झाले आहे.

या प्रकरणात एकूण ६ आरोपीचा समावेश असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे. यामध्ये ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर ३ जण फरार झाले आहेत. ताब्यात घेतलेले आरोपी हे शिरूर तालुक्यामधील आहेत. यामध्ये रामदास भोसले (वय- ३०), तुषार तांबे (वय- २२), भरत बांगर (वय- ३६) असे ताब्यात असलेल्या आरोपीची नावे आहेत. आरोपींनी लुटलेली रक्कम उसाच्या शेतात लपून ठेवलेली होती.

या प्रकरणाची कारवाई करत असताना कारवाईमध्ये स्विफ्ट कार, बुलेट, मोटार सायकल, ज्युपिटर मोटार सायकल हे जप्त करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. पैसे घेऊन जाणाऱ्यापैकी कुणीतरी माहिती दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. डिजिटल व्यवहार होत असतांना देखील इतकी मोठी रक्कम बसने मुंबईला का घेऊन जात होते हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT