Crime  SaamTvNews
मुंबई/पुणे

Video Call करणा-या दुकानदारास महिलांनी चाेपले; पुष्पराजवर विनयभंगाचा गुन्हा

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अजय दुधाणे

बदलापुर : बदलापुरात (badlapur) एका दुकानदाराला महिलांनी (women) दुकानात घुसून मारहाण केली आहे. हा दुकानदार त्याच्या दुकानात आलेल्या महिलांकडून मोबाईल नंबर (mobile number) घ्यायचा आणि नंतर त्यांना व्हिडिओ कॉल (video call) करून त्रास द्यायचा अशी तक्रार समोर आली होती. दरम्यान चाेप दिलेल्या दुकानादारावर पाेलिसांनी (police) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. (badlapur latest crime news)

याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी : बदलापूरच्या पश्चिम भागातील आशीर्वाद हॉस्पिटल समोर अनामिका नोवेल्टी नावाचं स्टेशनरी शॉप आहे. या दुकानात आलेल्या महिलांकडून दुकानदार पुष्पराज परिहार हा त्यांचे नंबर काहीतरी निमित्ताने घ्यायचा आणि नंबर सेव्ह करून ठेवायचा.

त्यानंतर या महिलांना व्हिडिओ कॉल करून पुष्पराज त्रास द्यायचा अशा काही तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे स्थानिक महिलांनी रविवारी संध्याकाळी पुष्पराज याला दुकानात जाऊन चोप दिला. तसेच माफी मागायला भाग पाडलं. यानंतर महिलांनी त्यास पोलिसांच्या ताब्यात दिलं. पुष्पराज याच्या विरोधात महिलांच्या तक्रारीनूसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

SCROLL FOR NEXT