Ambernath Police Bharti Candidate Pratiksha Rane Sucide News Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath : सरकारी नोकरीच स्वप्न अधुरं राहिलं, तरुणीने राहत्या घरात संपवलं जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक कारण उघडं

Ambernath Police Bharti Candidate Pratiksha Rane Sucide News : अंबरनाथ येथे पोलीस भरतीत निवड न झाल्याच्या नैराश्यातून २६ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तिने सरकारी नोकरीचे स्वप्न अपुरे राहिल्याची खंत व्यक्त केली आहे.

Alisha Khedekar

  • पोलीस भरतीत अपयश आल्याने नैराश्य

  • २६ वर्षीय एम.कॉम पदवीधर तरुणीचे टोकाचे पाऊल

  • सुसाईड नोटमध्ये सरकारी नोकरीची खंत व्यक्त

  • अंबरनाथ परिसरात हळहळ

अजय दुधाणे,अंबरनाथ

Ambernath Police Recruitment Failure 26 Years Old Girl Candidate Sucide राज्यभरात पोलीस भरती सुरु असताना एका तरुणीने निवड झाल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. सदर घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे. तरुणीच्या जाण्याने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव प्रतीक्षा राणे असे आहे. प्रतीक्षा अंबरनाथ पश्चिमेच्या भेंडीपाडा परिसरात कुटूंबासोबत राहत होती. प्रतीक्षाचं एम.कॉम पर्यंत शिक्षण झालं होतं. तिला सरकारी नोकरीची आवड असल्यानं तिने पोलीस भरतीत सहभाग घेतला, मात्र तिथे तिची निवड झाली नाही. याच नैराश्येतून तिने टोकाचं पाऊल उचलत घरातच गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी प्रतिक्षाने सुसाईड नोट देखील लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होत की, "२६ वर्षांची असूनही मला कमावता आलं नाही. मला सरकारी नोकरीची आवड होती. सरकारी नोकरी लागल्यावर आईवडिलांना जे जीवन द्यायचं होतं ते देता आलं नाही. त्यामुळेच मी आत्महत्या करते" असा मजकूर तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केला आहे.

या घटनेनं राणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. प्रतिक्षाला आणखी २ वेळा पोलीस भरती देता आली असती, पण पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतर तिने हार मानली आणि हे टोकाचं पाऊल उचललं. काळजाला चटका लावणाऱ्या या घटनेनं अंबरनाथमध्ये हळहळ व्यक्त होते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने खरेदीदारांच्या खिशाला कात्री, सलग चौथ्या दिवशी दरवाढ; आजचा ताजा भाव काय?

Maharashtra News Live Update: कृषी शिक्षणात महाराष्ट्र पडला मागे... राष्ट्रीय मानांकन यादीतून राहुरी कृषी विद्यापीठ ' आऊट '

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

SCROLL FOR NEXT