Devendra Fadnavis on Deputy CM Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: पाऊस असेल त्या ठिकाणची पोलीस भरती प्रक्रिया रद्द; गृहमंत्री फडणवीसांची घोषणा, VIDEO

Devendra Fadnavis on police bharti 2024: राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा फटका पोलीस भरतीला बसला आहे. 'पाऊस असेल त्या ठिकाणची पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

Vishal Gangurde

गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचवेळी राज्यात दुसरीकडे पोलीस भरती सुरु आहे. या मुसळधार पावसाचा फटका पोलीस भरतीला बसताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी या पोलीस भरतीबाबत महत्वाची माहिती दिली. राज्यात जिथे पाऊस तिथे पोलीस भरती पुढे ढकलली आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडवीस यांनी सांगितले.

राज्यातील काही ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया रद्द झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठं भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, त्यानंतर आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली आहे.

'मुलांचे वय निघून जाईल. त्यानंतर त्यांना दुसरी संधीही मिळत नाही. त्यात मुले घरी चालले आहेत. त्यांच्यासाठी फारशा व्यवस्था नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी मंगल कार्यालयात व्यवस्था करायला सांगितली आहे', असेही त्यांनी जूनमध्ये पोलीस भरती घेण्यावर भाष्य केलं.

नव्या प्रकल्पाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, 'इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी एक प्रकल्प तयार करत आहोत. यात एक कंपनी सरकारने तयार केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कायदा आणि सुव्यवस्थेकरिता करता येणार आहे. त्याचे मॉड्युल तयार केले होते, त्याचे सादरीकरण आज झाले. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल'.

'प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे, सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी याच्या माध्यमातून शोधून काढू शकतो. काही महिने लागतात, ते काही मिनिटांत शोधता येईल. वाहतूक नियोजनात फायदा होईल. या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईल. आपण सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार केले आहे. लवकरच ते कार्यान्वित होईल. त्यामुळे देशात सर्वात सशक्त पोलीस दल आपलं असेल, अशीही माहिती फडणवीस यांनी सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT