Thane News  Saam TV
मुंबई/पुणे

Thane Crime News : ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड, जवळपास 100 तरुण ताब्यात; पार्टीत नेमकं काय सुरु होतं?

Thane Rave Party News : रेव्ह पार्टी सुरू असल्याच्या संशयावरून सदर कारवाई करण्यात आली आहे. या पार्टीसाठी आलेल्या तरुण अणि तरुणींना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. 90 युवक आणि 5 महिला यांचा समावेश यामध्ये आहे.

साम टिव्ही ब्युरो

विकास काटे

Thane Crime News :

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. सर्वत्र सुरु असलेल्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. ठाण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. ठाणे पोलिसानी घोडबंदर रोड परिसरात ही कारवाई केली आहे. लाखो रुपयांचा अवैध सामान पोलिसांना जप्त केलं आहे.

रेव्ह पार्टी सुरू असल्याच्या संशयावरून सदर कारवाई करण्यात आली आहे. या पार्टीसाठी आलेल्या तरुण अणि तरुणींना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. 90 युवक आणि 5 महिला यांचा समावेश यामध्ये आहे. त्यांना तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. छाप्यात पोलिसांना चरस अणि गांजा तसेच एमडी ड्रग देखील सापडले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठाणे पोलिसांच्या युनिट 5 कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसाक, 31 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता वडवली खाडीकिनारी ही रेव्ह पार्टी चालू होती. छाप्यादरम्यान या ठिकाणी जमलेले 90 पुरुष, 5 महिला दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या तालावर नाचत होते.

या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे आयोजन तेजस अनिल कुबल, सुजल महादेव महाजन यांनी केले होते. याठिकाणी चरस (70 ग्रॅम), एलएसडी (0.41 ग्रॅम), एस्केटसी पिल्स (2.10 ग्रॅम), गांजा (200 ग्रॅम), बिअर/वाइन/व्हिस्की आणि मद्य विक्रीसाठी असल्याचे आढळून आले. तसेच घटनास्थळावरून गांजा ओढण्याचे साहित्य, डीजे मशीन, 29 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT