New Year celebration: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; हुल्लडबाज पर्यटकांवर होणार थेट कारवाई

Happy New Year 2024: लोणावळा म्हटलं की वर्षाचे बारा महिने लोणावळा पर्यटकांनी गजबजलेला असतो. लोणावळ्यात येऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची एक वेगळीच मजा असते.
New Year celebration
New Year celebrationSaam Digital
Published On

New Year Celebration In Lonavala

नव वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी पर्यटनस्थळांना भेट देण्याचा प्लॅन केला आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. येथील निसर्ग आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोनावळ्याला पर्यटकांनी पसंती दिलेली आहे. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोणावळा म्हटलं की वर्षाचे बारा महिने लोणावळा पर्यटकांनी गजबजलेला असतो. लोणावळ्यात येऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची एक वेगळीच मजा असते. टायगर पॉईंटसह इतर अन्य पॉईंटमध्ये असलेल्या हॉटेलमधील व्यंजनावर ताव मारण्याकरिता पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटन नगरीत दाखल झालेले आहेत.

हॉटेलमध्ये खास नियोजन

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रात्री बाराच्या पुढे हॉटेल बंद करणे अनिवार्य आहे, तसेच मोठ्या आवाजात डीजेच्या तालावर धांगडधिंगा न घालण्याच्या सूचना लोणावळा पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक यांना दिल्या आहेत तसेच कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या रिसोर्ट, खासगी बंगले तसेच हॉटेल चालकांनी वेळेचं भान ठेवावे, सीसीटीव्ही लावावे, महिला लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, प्रत्येक पर्यटकांचे ओळखपत्र पाहूनच प्रवेश द्यावा असा इशारा पोलिसांनी दिलाय.

हुल्लडबाज पर्यटकांवर थेट कारवाई

याकाळात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांवर तसेच हुल्लडबाज पर्यटकांवर थेट कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पर्यटकांच्या वाहनांची तपासणी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे. पर्यटकांनी मद्यशील पदार्थ पर्यटन नगरीत आणू नये यासाठी ही तपासणी मोहीम सुरू आहे. तसेच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाईचा इशारा लोणावळा पोलिसांनी दिला आहे.

गड किल्लांवर सेलिब्रेशन कराल तर नववर्षाची सुरुवात पोलिस कोठडीत

लोणावळा आणि खंडाळा तसेच मावळात ह्या पर्यटनस्थळी लाखो नागरिक नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवर्षाचे स्वागत करण्यासाठी येतात. नवीन वर्षाचे स्वागत हे मादक पदार्थांचे सेवन करण्याची नवीन विकृत संकल्पना सध्या रूजत चालली आहे.

काही तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्यभाषा, गैरवर्तन करत हुल्लडबाजी करून धिंगाणा घालतात. अनेकवेळा तरुणामध्ये मादक पदार्थांचे सेवन केल्याने त्यांना कशाचे भान राहत नाही. अनेकवेळा याचे भांडणात रूपांतर होते. याचा परिणाम सर्वांना सोसावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी आशा पर्यटकांवर ताबा ठेवण्यासाठी कडक धोरण अवलंबले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com