CBD Belapur Shahbaz village building collapsed Saam TV
मुंबई/पुणे

Belapur Building Collapse : नवी मुंबईतील बेलापुरात इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

साम टिव्ही

नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापुरात आज शनिवारी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारस इमारत कोसळल्याची घटना घडली. इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या बांधकाम व्यावसायिकावर एनआयर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूरच्या शहाबाज नगरमध्ये ३ मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. शनिवारी पहाटे कोसळलेल्या जी प्लस ३ मजली इमारत दुर्घटनेमध्ये तीन रहिवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनंतर बांधकाम व्यावसायिकावर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत अनेक रहिवासी जखमी झाले आहेत. ३ मजली इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घरात पहाटेच्या सुमारास बाजूच्या इमारतीत झोपलेले सर्वच रहिवासी घराबाहेर आले. या रहिवाशांनी तातडीने या दुर्घटनेची माहिती पोलिसांना कळवली.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. या बैठकीआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर या दुर्घटनेतील आपत्तीग्रस्तांनाही मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना नवी मुंबई महापालिका आयुक्तांना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला होता. त्यांनी फोनवरील संभाषणादरम्यान बेलापूर इमारत दुर्घटनेशी संबंधित माहिती जाणून घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT