Naveen Kumar Jindal saam Tv
मुंबई/पुणे

नवीन कुमार जिंदाल यांच्या अडचणी वाढल्या, पुण्यातही गुन्हा दाखल

नवीन कुमार जिंदाल यांच्या ट्विटमुळे सामजिक तेढ निर्माण झाल्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्याबाबत अवमानकारक ट्विट केल्याप्रकरणी भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेले नवीनकुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांच्यावर आता पुण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंदाल यांच्या ट्विटमुळे सामजिक तेढ निर्माण झाल्यामुळे कोंढवा पोलीस ठाण्यात (Police case filed) तक्रार दाखल करण्यात आलीय.

कोंढवा मीठानगर येथील झाकीर इलियास शेख यांनी जिंदा यांच्याविरोधात तक्रार दिलीय. त्यानूसार, नवीनकुमार जिंदाल याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या १५३ (ए),१५३ (बी),२९५ (अ),२९८,५०५ (२) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीनकुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांच्या या टिपण्णीनंतर राज्यासह देशभरात पडसाद उमटले असून मुस्लिम समाज काल शुक्रवारी रस्त्यावर उतरला. जिंदाल आणि निलंबित भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात राज्यातील सोलापूर, नगरसह इतर शहरात मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले.

आंदोलकांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कोंढव्यातील कार्यकर्ते झाकीर यांनी देखील कोंढवा पोलीस ठाण्यात जिंदाल याच्याविरोधात तक्रार दिली. जिंदाल यांनी १ जून रोजी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विवाहाविषयी वादग्रस्त ट्विट करत मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Pixel 10 Pro Fold 5G भारतात लाँच, काय आहेत दमदार फिचर्स आणि किंमत? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, पावासाचा हाहाकार

Ghoghla Beach : घोघला समुद्रकिनारा निसर्गप्रेमींसाठी पर्वणी, एकदा भेट द्याच

Pune : पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नामकरण आता ‘राजगड’, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Pandharpur Flood Alert : चंद्रभागेने इशारा पातळी ओलांडली, ८ घाट बंद, पंढरपुराला पुराचा धोका, पाहा भयावह व्हिडिओ

SCROLL FOR NEXT