उल्हासनगरात थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांची दादागिरी? अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगरात थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांची दादागिरी?

घराबाहेर उभ्या असलेल्या तरुणांच्या अंगावर घातली बुलेट; जो दिसेल त्याला पोलीस अधिकाऱ्याने केली मारहाण

अजय दुधाणे

उल्हासनगर - कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी थर्टी फर्स्टच्या रात्री मात्र दादागिरी केल्याचं समोर आलंय. एका पोलीस अधिकाऱ्याने घराबाहेर उभ्या असलेल्या तरुणांच्या अंगावर बुलेट घालत जो दिसेल त्याला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडलीये.

उल्हासनगरच्या कॅम्प ३ परिसरात थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांची गस्त सुरू होती. कौशल नगर परिसरात रात्रीच्या सुमारास काही तरुण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर जमले होते. याचवेळी रात्रीच्या गस्तीवर असलेले मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे हे तिथून त्यांच्या बुलेटवर चालले होते.

हे देखील पहा -

मात्र घराबाहेर उभ्या असलेल्या मुलांना पाहून त्यांनी थेट ग मुलांच्या अंगावर बुलेट घातली. इतकंच नव्हे, तर जो सापडेल त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सुटले. तर एकाला पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर कारवाई सुद्धा केली.एपीआय पानसरे यांनी केलेल्या या मारहाणीत काही तरुणांना मुका मार लागला आहे. तर एका तरुणाचा मोबाईल सुद्धा फुटला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली, त्यावेळी पानसरे हे दारूच्या नशेत असल्याचा आरोप पीडित तरुणांनी केलाय. या सगळ्यावर पोलिसांची प्रतिक्रिया विचारली असता,उल्हासनगर परिमंडळ चार चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी विशेष चौकशी करून सत्यता पडताळली जाऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे फोन वर म्हटले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्गातच शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? पुणे हादरलं

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी

BDL Recruitment: दहावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT