Kalyan Crime News प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

पोलिसाची खलबत्याने ठेचून हत्या; कल्याणमध्ये मुलीच्या नांदण्यावरुन कुटुंबानेच घेतला बळी

मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची घरगुती वादातून पत्नी आणि मुलीने घरातील खलबत्याने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण : मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची घरगुती वादातून पत्नी आणि मुलीने घरातील खलबत्याने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पावशेनगर परिसरात घडली असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पत्नी आणि मुलीला बेड्या ठोकल्या आहेत. (Kalyan Crime News In Marathi)

कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पावशे नगर परिसरात आपल्या परिवारासोबत राहत होते. तीन वर्षापूर्वी मुलगी भाग्यश्री हिचे लग्न झाले असले तरी ती आपल्या पती सोबत राहत नसल्याने प्रकाश आणि त्यांच्या पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री यांच्यामध्ये सतत वाद होत होते. काल रात्री देखील त्यांच्यात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि वादात पत्नी आणि मुलीने त्याच्या बोरसे यांना खलबताने मारून डोके ठेचून त्यांची हत्या केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी प्रकाश यांची पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री बोरसे या दोघींना अटक करून पुढचा तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

ठाणे जिल्ह्यातील कल्याण कोळसेवाडी परिसरात मायलेकीने बापाची हत्या केली आहे. कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यानंतर काल संध्याकाळी सात वाजता ते कामावरून घरी आले होते. त्यानंतर भांडण झाल्यावर पत्नी आणि मुलीने मिळून बापाची हत्या केली आहे. या हल्ल्यामध्ये प्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला. माहितीनुसार, मृत्यूनंतर दोघी घराचा दरवाजा बंद करून एका बाजूला बसून राहिल्या होत्या. जवळपास चार तास दोघी घरात बसून होत्या.

याची माहिती कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना मिळाली. बशीर शेख यांनी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला आणि ते घरात शिरले. घरात प्रकाश यांचा मृतदेह आढळून आला तसेच मृतदेहाशेजारी या दोघीही बसून होत्या. पोलिसांनी या दोघींना देखील ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू केला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

SCROLL FOR NEXT