Pune crime news Saam Tv News
मुंबई/पुणे

किती पोरांसोबत झोपलीस, रांxxx आहेस की... कोथरूड पोलिसांवर तरूणींच्या छळाचा आरोप

Police Brutality in Pune: कोथरूड पोलीस ठाण्यात तीन तरुणींवर जातीय शिवीगाळ व छळाचा आरोप. पीएसआय प्रेमा पाटील आणि कामटे यांच्यावर गंभीर आरोप.

Bhagyashree Kamble

  • कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित तरुणींवर जातीय शिवीगाळ व छळाचा आरोप.

  • पीएसआय प्रेमा पाटील आणि कामटे यांच्यावर गंभीर आरोप.

  • पीडित तरुणींनी व्हिडीओद्वारे सामाजिक माध्यमांवर आपली आपबिती मांडली.

  • खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे सखोल चौकशीची मागणी केली.

पुणे कोथरूड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून पुण्यात आलेल्या तिन्ही तरुणींना कोथरूड पोलीस ठाण्यात जातिवाचक शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या तिन्ही तरुणी पुण्यात नोकरीसाठी राहत होत्या. एक तरुणी सासरच्या छळाला कंटाळून छत्रपती संभाजीनगरमधून पुण्यात या तीन तरूणींकडे आली होती. तिचा शोध घेत असलेल्या पोलिसांनी तिला कोथरूडमध्ये एका फ्लॅटमध्ये शोधून काढलं आणि तिच्यासह त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या इतर तीन तरुणींनाही ताब्यात घेतलं.

तिन्ही मुलींनी कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कामटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिन्हींमधील एका तरूणीनं फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत सगळा प्रकार सांगितला. चारित्र्यावर, अपमानजनक - जाचीवाचक शिवीगाळ आणि कपड्यांवरून वाईट बोलल्याचा आरोप तिनं या व्हिडिओतून.

पीएसआय कामटे यांनी एका तरूणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण, तसेच चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. या तिन्ही तरूणी पुण्यात जॉब करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, तपासाचा भाग म्हणून काही प्रश्न विचारल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणाची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. 'कोथरूड पोलिसांनी तीन तरूणींना ताब्यात घेत शिवीगाळ केली. तसेच मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. याबाबतचा पुरावा व्हॉट्सअॅपवर (व्हिडिओ) प्राप्त झाला आहे. जर हे खरं असेल तर, खरंच ही गंभीर बाब आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी', अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

नेमकं घडलं काय?

पीडित तरूणींपैकी एकीनं या घटनेबाबत माहिती देत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 'काल छत्रपती संभाजीनगरमधील एका केसचा तपास करण्यासाठी पोलीस कोथरूडमध्ये आले. त्यांनी आम्हाला ताब्यात घेतलं. रिमांड रूममध्ये पाच तास ठेवलं. तिन्ही तरूणींना मानसिक तसेच शारीरिक छळ केला. पीएसआय प्रेमा पाटील या तरूणींना म्हणाल्या की, तुम्हीxxx ना.. तुम्ही मग असंच वागणार. तुम्ही वाया जाणार आहात. तुमची जातच अशी आहे. तू किती पोरांसोबत झोxxx, तू रांxxx आहे', असं प्रेमा पाटील म्हणाल्या. तसेच इतर पोलिसांनीही त्यांचा छळ केल्याचा आरोप पीडित तरूणींनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज सावध रहा… विश्वासूच देऊ शकतात धोका; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: ठाण्यातील मुंब्रा परिसरात नायजेरियन व्यक्तीचा धुमाकूळ

No Handshake Ind vs Pak : पाकिस्तानला पराभव सहन झालाच नाही, रडगाणं सुरू; नो हँडशेक जिव्हारी लागल्यानं भारताची तक्रार

Samruddhi Mahamarg: 'मर्सिडीज'ने समृद्धी महामार्ग घेतला दत्तक, अपघात रोखण्यासाठी करणार प्रयत्न; कसा असणार प्लान?

Nashik Crime : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT