Mumbai Police Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Police : पोलिसांनो, गणेशोत्सवात नाचू नका, नाहीतर...; पोलीस आयुक्तांनी आदेशच काढला!

Police Banned Dancing during ganeshotsav : गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यापासून मनाई करण्यात आलीय. मुंबई पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही पुणे

राज्यात गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. गणरायाचं आज वाजत गाजत, ढोल ताश्याच्या गजरात आगमन होत आहे. दरम्यान लहान मोठ्यांपासून सगळ्यांनाच नाचण्याचा मोह आवरत नाही. गणेशोत्सवादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सुरक्षा व्यवस्थेत तैनात असतात. गणरायच्या आगमनाचा आनंद सर्वांनाच होतो. अनेकदा पोलीस बांधवांना देखील गणेशोत्सवादरम्यान नाचण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे पोलिस बांधवांसाठीच ही बातमी महत्वाची आहे.

गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यापासून मनाई

यंदा गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यापासून मनाई करण्यात आलेली (Police Banned Dancing during ganeshotsav) आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हे आदेश काढले आहेत. गणेशोत्सवादरम्यान पोलीस कर्मचारी नाचताना आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल, अशी तंबी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिलीय. गणेशोत्सवासाठी सुरक्षा आणि बंदोबस्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना ताकीद दिलीय.

काय म्हणाले पोलीस आयुक्त ?

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था आणि पोलीस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या बैठकमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना ही विशेष तंबी (Mumbai Ganeshotsav) दिलीय. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. यावेळी मुंबईमध्ये पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान वर्दीमध्ये नाचू नये, अशी ताकीद पोलीस आयुक्तांनी दिलीय. त्यांनी सर्व पोलीसांना महत्वाचे आदेश दिलेत.

कारवाई होणार...

गणेशोत्सवादरम्यान ढोल-ताशांच्या गजरामध्ये कोणताही पोलीस कर्मचारी नाचताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी गणवेशाचा आदर राखावा, असं आवाहन त्यांनी (Mumbai Police) केलंय. त्यामुळे आता गणेशोत्सवादरम्यान नाचणं पोलिसांना महागात पडणार आहे, याची सर्व पोलिसांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT